spot_img
अहमदनगरAhmednagar News : नगर अर्बनचा मोठा घोटाळा उघड ! 'ती' रक्कम गांधींच्या...

Ahmednagar News : नगर अर्बनचा मोठा घोटाळा उघड ! ‘ती’ रक्कम गांधींच्या अकाउंटवर

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर मधील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर आता यातील तपासात अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक ऑडिट केल्यानंतर हा घोटाळा तब्बल ३०० कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे.

या अहवालानुसार बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांनी संगनमत करून तब्बल २९१ कोटींचा गैरव्यवहार केला आहे. पोलिसांनी न्यायालयात गुरुवारी झालेल्या युक्तिवाद दरम्यान ही माहिती दिली. बँक गैरव्यवहार प्रकरणी सध्या राजेंद्र शांतीलाल लुणिया (वय ५६, रा. राऊतमळा, कल्याण रोड) व प्रदीप जगन्नाथ पाटील (वय ५५, रा. रेणावीकरनगर, सावेडी) हे दोघे अटकेत आहेत. या दोघांना गुरुवारी येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

त्यांना जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.व्ही. सहारे यांनी १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. हे दोघे नगर अर्बन बँकेत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा या गैख्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद आहे.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्यादृष्टीने तपास करायचा आहे. या गैरव्यवहाराच्या रकमेतील काही रकमा अधिकाऱ्यांच्या खात्यावरही वर्ग झालेल्या आहेत, यातील किती रक्कम त्यांनी स्वतः साठी ठेवून घेतली आणि किती दुस-यांच्या खात्यावर वर्ग केली, ही माहिती मिळणे तपासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे दोघा आरोपींना १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांनी केली.

  ‘ती’ रक्कम सुवेंद्र गांधीच्या खात्यावर वर्ग
सध्या अटकेत असणारा आरोपी राजेंद लुणिया हा २०१४ मध्ये बँकेचा शाखा अधिकारी असताना सम्यक ट्रेडर्स नावाच्या खात्यातून दि. १ जून २०१४ रोजी २० लाख रुपये स्वतः च्या खात्यात घेतले असल्याचे दिसते. त्यातील ४४ हजार रुपये त्याने काढले व उर्वरित १९ लाख ५६ हजार रुपये त्याने माजी नगरसेवक सुर्वेद गांधी यांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे तपासात समोर आले आहे. ही रक्कम नंतर विड्रॉल झाली, ती कुणी विड्रॉल केली, हे अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आजच्या दिवशी...

४२ लाखांची रोकड पकडली! नगरमध्ये पैसाच-पैसा? शहरात पुन्हा उडाली खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रशासनाला कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या...