spot_img
अहमदनगरAhmednagar News : उद्या महायुतीचा मेळावा ! खा.विखे म्हणतात '४५ प्लस खासदार'मिशनमध्ये...

Ahmednagar News : उद्या महायुतीचा मेळावा ! खा.विखे म्हणतात ‘४५ प्लस खासदार’मिशनमध्ये नगरकरांचे जास्त योगदान राहणार..

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यात उद्या महायुतीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर असणार आहे. याबाबत खा. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांनी आज (१३ जानेवारी) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले, उत्तर नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष संपत बारस्कर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

* कुठे व कधी आहे मेळावा?
१४ जानेवारी सकाळी ११ वाजता शहरातील बंधन लॉन्स कार्यालयात हा महाविजय २०२४ हा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी-माजी आमदार त्याप्रमाणे पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे सर्व आजी-माजी आमदार, तसेच महापालिकेचे माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सह शिवसेनेचे (शिंदे) जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकार्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.

* काय म्हणाले खा. सुजय विखे
महायुतीच्या मेळाव्यातून  नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. या मेळाव्यास महायुतीतील घटक पक्ष असतील. याची जय्यत तयारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार करतानाच राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवून महायुती काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री विखे पाटील यांच्या नगर आणि श्रीरामपूर येथे घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेवून महामेळाव्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रविवारच्या मेळाव्यात सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगून महायुती मध्ये  चांगला समन्वय असल्याचे खा.विखे पाटील याची सांगितले.

 काय म्हणाले आ. जगताप
आ.जगताप म्हणाले की,राज्यातून लोकसभा निवडणुकीत ४५ जागा विजयी करण्याचा निर्धार करतानाच यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात एकत्रितपणे महायुतीतील सर्व घटक पक्ष नियोजन करणार असल्याचे त्याची सांगितले.

 राणी लंके यांचा विषय काढताच खा. विखे यांचे ‘नो कमेंट्स’
पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने खा. विखे यांना आ. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्याविषयी विचारले. त्यांनी राहुरीमध्ये खासदारकी लढवणारच असे वक्तव्य केले होते. त्यावर खा. सुजय विखे यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रश्नावर ‘नो कमेंट्स’ असे उत्तर देत थेट या विषयालाच बगल दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

ठाकरे शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...

इंदुरीकर महाराजांचा खरा चेहरा पुढे, थेट जावयानेच केला मोठा खुलासा

संगमनेर / नगर सह्याद्री - इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामुळे कायमच चर्चेत असतात. मात्र, मुलीचा...