spot_img
अहमदनगरAhmednagar News : अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करा, अहमदनगर बार असोशिएशनची मागणी

Ahmednagar News : अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करा, अहमदनगर बार असोशिएशनची मागणी

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : राज्यामध्ये वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात नुकतीच राहुरी येथे वकील दांपत्यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वकीलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये तातडीने वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आज दुपारी शहर वकील संघटनेच्या वतीने सर्व वकिलांनी कामकाज बंद ठेवत जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला.

एक वकील लाख वकील…., अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू झालाच पाहिजे… अशा जोरदार घोषणा यावेळी वकिलांनी दिल्या. या मोर्चास शहरातील सेन्ट्रल बार, कौटुंबिक न्यायालय वकील असोसिएशन, धर्मादाय आयुक्त न्यायालय बार असोसिएशन सह, भाजपा वकील आघाडीच्या वतीने पाठींबा देण्यात आला. संघटनाचे शेकडो वकील या पायी मोर्च्यात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना वकील संघटनेचे सचिव अॅड.संदीप शेळके व उपाध्यक्ष अॅड.महेश शेडाळे यांनी निवेदन दिले.

अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी अहमदनगर बार असोशिएशनने केली आहे. त्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराषट्रात वकिलांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वकील वर्गात चिंतेचे वातावरण आहे. वकीलांना निर्भयपणे काम करण्यासाठी तशी वातावरण निर्मिती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या संदर्भात बार कौन्सिल महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या वतीने शासनाकडे अॅडव्होकेट प्रोटेक्शन बीलचा मसुदा सहा महिन्यांपूर्वीच सादर केलेला आहे.

परंतु याबाबत शासन स्तरावर कुठलीही कारवाई अदयाप झालेली नाही. राहुरी तालुक्यातील विधिज्ञ राजाराम आढाव व मनीषा आढाव यांचा खून झाला. त्यामुळे राज्यातील वकील वर्गात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे अॅडव्होकेट प्रोटेक्शन बील लागू करण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी अॅड. नरेश गुगळे, अॅड. संदीप शेळके, अॅड. महेश शेडाळे, अॅड. शिवाजी शिरसाठ, अॅड. संजय सुंबे, अॅड. भक्ती शिरसाठ, अॅड. अमोल अकोलकर, अॅड. सारस क्षेत्रे, अॅड. विनोद रणसिंग, अॅड. देवदत्त शहाणे, अॅड. शिवाजी शिंदे, अॅड. अस्मिता उदावंत, अॅड. रामेश्वर कराळे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरात रक्तरंजित हल्ला! सख्या भावंडांवर सपासप वार

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- केडगाव परिसरात एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार, दुप्पट नफा मिळणार ! जाणून घ्या तुमचा आजचा दिवस!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. थोड्या...

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...