अहमदनगर / नगर सहयाद्री : किरकोळ कारणांतून पती पत्नीसह त्यांच्या मुलीस बेदम मारहाण केल्याची घटना दरेवाडी येथे घडली. शोभा उबाळे यांनी याबाबत फिर्याद दिली असून असून विराज उबाळे असे आरोपीचे नाव आहे.
या मराहणीमध्ये शोभा उबाळे, त्यांचे पती, मुलगी प्रियांका हे जखमी झाले. अधिक माहिती अशी : आरोपी विराज हा घरात टीव्ही पाहत होता. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे पती आपसांत बोलत होते. आरोपीस याचा राग आल्याने त्याने शोभा उबाळे यांच्या पतीस मारहाण केली.
शोभा या त्यास समजावून सांगण्यास गेल्या असता आरोपीने त्यांनाही मारहाण करून त्यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. त्यांची मुलगी प्रियंका ही सोडवण्यास आली असता तिलाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर शोभा यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली आहे.