spot_img
अहमदनगरAhmednagar News : दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली, मोक्कामधील फरार आरोपीसह चौघे ताब्यात

Ahmednagar News : दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली, मोक्कामधील फरार आरोपीसह चौघे ताब्यात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे ४ साथीदार पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. दोघे मात्र फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून त्यांच्याकडून 1 तलवार, 1 कटावणी, 1 कत्ती, 1 लाकडी दांडके, मिरचीपुड, 1 ऍ़पल व 3 विविध कंपनीचे मोबाईल फोन, 1 इर्टीगा व 1 वोल्क्सवॅगन कार असा 10 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड (वय 21, रा.इंदिरानगर, ता.कोपरगाव), अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे (वय 20, रा.एकरुखे, ता.राहाता), समाधान देविदास राठोड (वय 23, रा.करंजीबोलकी, ता.कोपरगाव), संदीप पुंजा बनकर (वय 33, रा.द्वारकानगर रोड, शिर्डी), उमेश तानाजी वायदंडे (वय 27, रा.गणेशनगर, ता.राहाता) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश भिकुनाथ तेलोरे (रा. गणेशनगर, ता.राहाता), राहुल शिवाजी शिदोरे (रा.गोकुळनगर, ता.कोपरगाव) हे फरार झाले आहेत.

अधिक माहिती अशी : जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघड करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार त्यांनी सपोनि हेमंत थोरात यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय गव्हाणे आदींचे पथक तयार करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केले.

यानुसार कारवाई करत असताना सपोनि हेमंत थोरात यांना 15 फेब्रुवारीला गुप्त माहिती मिळाली की, मयूर उर्फ भुऱ्या गायकवाड त्याच्या काही साथीदारासह 2 कारमध्ये येऊन देर्डे-कोऱ्हाळे शिवारात दरोडा घालण्याचे तयारीत आहे. थोरात यांनी प्राप्त माहिती पथकास दिली. पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना झाले. या ठिकाणी काही इसम अंधारामध्ये दिसून आले. पाठलाग करत पोलिसांनी वरील आरोपीना ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“स्थानिकांकडूनच खरेदी करा; हाच खरा स्वदेशी आणि हिंदुत्वाचा उत्सव” : नगरसेवक योगीराज गाडे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : दिवाळीचा सण जवळ आला असताना, नागरिकांनी स्वदेशी आणि स्थानिकांना प्राधान्य...

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या बसला भीषण आग, २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण...

झेडपीसाठी मोठी अपडेट, 28 ऑक्टोबरला अंतिम…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै...

आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

जवळा जिल्हा परिषद गटात रस्सीखेच | सुजित झावरे, दीपक लंके, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत,...