spot_img
अहमदनगरAhmednagar News : ब्रेकिंग : दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे शेतीकर्ज वसुलीस स्थगिती

Ahmednagar News : ब्रेकिंग : दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे शेतीकर्ज वसुलीस स्थगिती

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील 1 हजार 21 महसुली मंडळामध्ये अनेक सवलती जाहिर केल्या असुन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती घेण्याचाही निर्णय घेतला आहे.

याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली. या शासन निर्णयाबाबत बँकेच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

बँकेचे शेती निगडित कर्ज 4 हजार 614 कोटीचे वसुलास पात्र असुन त्यापैकी 125 कोटी रकमेची वसुली आली आहे. ज्या कर्जदार शेतकर्‍यांना स्वतःहून कर्ज वसुली द्यावयाची असल्यास अशा कर्जदारांसाठी बँकेकडून वसुली स्विकारली जाईल. विहित मुदतीत कर्ज भरणार्‍या सभासदांना शासनाच्या शुन्य टक्के व्याजदर सवलतीचा लाभ होईल. तसेच पुढील पिक कर्ज वितरणही होईल. अशी माहिती अध्यक्ष कर्डिले यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज, केली ‘ही’ मागणी

१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा पारनेर /...

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...