spot_img
अहमदनगरAhmednagar News : नववर्षाला हुल्लडबाजी कराल तर सावधान ! कोतवाली पोलीस ऍक्शनमोड...

Ahmednagar News : नववर्षाला हुल्लडबाजी कराल तर सावधान ! कोतवाली पोलीस ऍक्शनमोड वर

spot_img
अहमदनगर / नगर सह्याद्री : आज 31 डिसेंबर, उद्या नवीन वर्ष सुरू होईल. नवीन वर्षाचा अनेक ठिकाणी मोठा जल्लोष साजरा केला जातो. परंतु बऱ्याचदा तरुणांकडून दारूच्या नशेत  हुल्लडबाजी केली जाते. यात अनेक चुकीची व अवैध कामेही केली जातात. याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.२९ पासून दंगा मस्ती करत ट्रिपल सीट फिरणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना क्रमांकाची वाहने, पुणे बस स्थानक माळीवाडा बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात संशयित रित्या फिरणे- दंगा करणे तसेच चालक परवाने नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
नवीन वर्षाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलचालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. ‘नववर्षाचे स्वागत करण्याबाबत हरकत नाही मात्र दारू पिऊन हुल्लडबाजी करणे दारू पिऊन अस्ताव्यस्त वाहने चालवणे अशा टवाळखोरांवर कारवाई करणार असल्याच्या सूचना यादव यांनी दिल्या आहेत. अशा प्रकारांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. दि.२९ पासून सुरु केलेली ही मोहीम दि.३१ चे रात्री  सुद्धा ही मोहीम सुरु राहणार आहे.
आत्तापर्यंत १६ वाहने आणि 11 युवकांवर कारवाई केली आहे. या तीन दिवसाच्या कालावधीत रस्त्यावरील वाहनांवर आणि तरुणाईवर कोतवाली पोलिसांचे लक्ष राहणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पिंगळे, गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, विश्वास भानसी, पोलिस जवान विशाल कुलकर्णी, अनुप झाडबुके , सतीश भांड , विजय कोतकर
आदी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...