अहमदनगर / नगर सह्याद्री : कत्तलीच्या उद्देशाने जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. अरबाज गफुर शेख (वय 33 वर्षे, रा. काटवन खंडोबा, अहमदनगर), कल्लू उर्फ सोफियान इद्रीस कुरेशी (रा.झेंडीगेट, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 5 लाख रुपयांची महिंद्रा पिकअप, 65 हजारांची तीन मोठी व दोन छोटी अशी 5 जनावरे ताब्यात घेतली. १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ च्या सुमारास नगर शहरातील पराग बिल्डींगजवळील रोडवर ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना पीकपमधून गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याकरिता आणलेले असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस स्टाफला त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्या ठिकाणी जात छापा टाकत वरील कारवाई केली. वरील आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. 187/2024 भादंवि.क. 269 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे कलम 5 (अ), 9, प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करणेबाबतचा अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ. संतोष बनकर करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ शाहीद शेख, मपोना/संगीता बडे, पो.कॉ. दीपक रोहोकले, पो.कॉ. सत्यजित शिंदे, पो.कॉ. तानाजी पवार, पो.कॉ. सुरज कदम, पो.कॉ. सोमनाथ केकान, पो.कॉ. शिवाजी मोरे, पो.कॉ. महेश पवार, पो.कॉ. अभय कदम, पो.कॉ. अमोल गाडे यांनी केली आहे.