spot_img
अहमदनगरAhmednagar News : ज्येष्ठ नेते आ.जयंत पाटलांचे शहर काँग्रेसकडून स्वागत

Ahmednagar News : ज्येष्ठ नेते आ.जयंत पाटलांचे शहर काँग्रेसकडून स्वागत

spot_img

नगर सह्याद्री / प्रतिनिधी : शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विजय निश्चय मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. सोलापूर दौरा आटोपून बुधवारी पाटील नगर शहरामध्ये राष्ट्रवादी भवन येथे दाखल झाले. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांचे काँग्रेसच्या वतीने स्वागत केले. यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना काळे म्हणाले, निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आलेला निकाल हा धक्कादायक आहे. निवडणूक आयोग नि:पक्षपातीपणे काम करत आहे की नाही याबद्दल जनमानसात संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. असे असले तरी देखील महाराष्ट्र मधील महाविकास आघाडी ही महायुतीचा येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव करण्यासाठी आणि देशाचे संविधान वाचविण्यासाठी एकसंधपणे लढत आहे. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. लवकरच महाविकास आघाडीचा नगर दक्षिणेचा उमेदवार जाहीर करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र फाळके, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे, काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, सावेडी उपनगर विभाग अध्यक्ष अभिनय गायकवाड, क्रीडा व युवक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...

जय-वीरूसारख्या जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचल! दोघांनीही केली आत्महत्या, शहरात खळबळ, कारण काय?

Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर...