अहमदनगर। नगर सहयाद्री
प्रतिष्ठित व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनवेगीरी करत तीस तेलाच्या डब्याला चुना लावल्याची घटना घडली आहे. व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका खाद्यतेल व्यावसायिकाला एका मोबाईल नंबर वरून एक कॉल आला. संभाजीनगर महामार्गेवरील हॉटेल सुवर्णज्योतचा मॅनेजर बोलतोय १०० डबे खाद्यतेलाची खरेदी करण्याची मागणी करत खाद्यतेल पोहोच करण्यास सांगितले. व्यावसायिकाने ऑर्डर प्रमाणे सुवर्णज्योत हॉटेल येथे पाठविले.
ग्राहकाने तीस डबे सुवर्णज्योत हॉटेल येथे ठेवण्यास सांगितले व सत्तत डबे संभाजीनगर महामार्गेवरील पांढरीपुल येथे नेण्यास सांगितले.सत्तत डबे पुढे पांढरीपुल येथे नेले असता तो ग्राहक तेथे आढळून न आल्याने व्यावसायिकाने आलेल्या नंबर वर कॉल केला असता फोन बंद येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचा प्रकार व्यावसायिकाच्या लक्षात आला.