spot_img
अहमदनगरअहमदनगर: पावणे तीन कोटीला गंडा घालणारा 'जेरबंद'; करायचा असं काही..

अहमदनगर: पावणे तीन कोटीला गंडा घालणारा ‘जेरबंद’; करायचा असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शेअर मार्केट गुंतवणूकीत पावणे तीन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध फिर्यादींच्या तक्रारीवरुन दाखल गुन्ह्यातील आरोपींला शेवगाव पोलीस पथकाने शिताफीने सापळा लावून जेरबंद केले. छत्रपती परमेश्वर विघ्ने ( रा.आंतरवली बु. ता.शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी बबन आण्णासाहेब शिरसाठ ( रा.नविन खामपिंप्री ता.शेवगाव ) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात इनव्हेस्टमेंट नावाच्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली त्यांची दोन कोटी पंच्चाहत्तर लाख रुपयांची फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना वरील गुन्ह्यातील आरोपी शेवगाव शहरामधील गाडगे महाराज चौक येथे येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक समाधान नागरे याच्या पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.

वरिल आरोपी विरुध्द इतरअन्य कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदरची कारवाईपोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोसई भास्कर गावंडे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकॉ प्रशांत आंधळे, पोकॉ संपत खेडकर, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ बप्पासाहेब धाकतोडे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...