spot_img
ब्रेकिंगअहमदनगर: 'लग्नाच्या वऱ्हाड परतत होतं अन्..', 'असा' झाला अपघात, 'इतके' जखमी

अहमदनगर: ‘लग्नाच्या वऱ्हाड परतत होतं अन्..’, ‘असा’ झाला अपघात, ‘इतके’ जखमी

spot_img

अहमदनगर| नगर सहयाद्री
लग्नाचे वर्‍हाड घेऊन माघारी परतत असताना या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जखमी झाले आहेत. वर्‍हाडाची जीप व ऊस वाहतूक करणार्‍या पिकअपचा हा अपघात छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी येथे झाला. हा अपघात शनिवारी (१६ मार्च) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचा पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले.

श्रीरामपूरमध्ये लग्नसोहळा होता. हे लग्न आटोपल्यानंतर गिरी व डांगे परिवार पैठण तालुयातील लोहगाव येथे पुन्हा माघारी निघाले होते. त्याचदरम्यान उसाचे वाडे घेऊन जाणारी एक पिकअप छत्रपती संभाजीनगरहन नगरच्या दिशेने जात असताना वर्‍हाडाची जीप ईसारवाडी फाट्याकडे वळण घेत असताना या दोन्ही वाहनांचा जबरदस्त अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात जवळपास नऊ प्रवासी गंभीर जखमी झालेत. गंभीर असणार्‍यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला होता. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जीपमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले होते. अपघताच्या माहितीनंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या अपघातात वैभव संदीप डांगे (१०), प्रतीक गजानन गिरी (१०), राजश्री गजानन गिरी (१२), रेखा अर्जुन डांगे (१४), आकांक्षा गजानन गिरी (१८), आशिष सुखदेव गिरी (२१), ऋतुजा आशिष गिरी (२०), अनिता संदीप डांगे (३०), सिंधू गिरी (४४) आदी प्रवासी जखमी झाल्याची माहिती समजली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मांडओहळ धरणातून उद्या आवर्तन सुटणार ; आ. काशिनाथ दातेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

पारनेर / नगर सह्याद्री - सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ परतीचा मान्सून समाधानकारक न झाल्यामुळे...

परभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

परभणी / नगर सह्याद्री - सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या...

पुणतांब्यात धार्मिक स्थळी तोडफोड; ग्रामस्थ आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- राहता तालुक्यातील पुणतांबा गावात अज्ञात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी तोडफोड केल्याची घटना...

Weather Update: हवामान बिघडलं! हिवाळ्यात पावसाळा; हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची...