spot_img
अहमदनगरAhmednagar: खुशखबर!! अनुदानित शाळांना मिळणार गिफ्ट, खासदार विखे पाटील यांचा 'मोठा' निर्धार

Ahmednagar: खुशखबर!! अनुदानित शाळांना मिळणार गिफ्ट, खासदार विखे पाटील यांचा ‘मोठा’ निर्धार

spot_img

पाथर्डी। नगर सहयाद्री
दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेनॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागात जेवढ्या अनुदानित शाळा आहेत, अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे.

करंजी (ता. पाथर्डी) येथील नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध खेळांचे मैदानी व इंटरॅटिव्ह पॅनल युक्त वर्गांचे उद्घाटन खासदार डॉ. विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटन झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून त्यांनी शिक्षकांचे अध्यापन ऐकले. विशेष म्हणजे बसविलेल्या इंटरॅटिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच युट्यूबसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हवी ती माहिती एका लिकवर उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाल्याचे खा. विखे म्हणाले.

विद्यार्थ्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील शिक्षण दर्जेदार होत आहे. याच अनुषंगाने गोरगरिबांना उच्चशिक्षित सुविधा मिळण्यासाठी आपण डिजिटल बोर्ड दिले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि अत्याधुनिक टेनॉलॉजीचा वापर करून विद्यार्थी अधिक सक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील वर्षात १०० व यावर्षी २०० डिजिटल बोर्ड आपण जिल्हा परिषद शाळांना दिले. विद्यार्थी समाजाचा महत्वपूर्ण घटक असून उद्याच्या विकसित भारतात त्यांची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. सुशिक्षित नेतृत्व निवडून दिल्यानंतर आपण विकासरुपी कायापालट कसा करू शकतो, याबद्दल विद्यार्थ्यांना सांगणे गरजेचे असल्याचे खा. विखे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“स्थानिकांकडूनच खरेदी करा; हाच खरा स्वदेशी आणि हिंदुत्वाचा उत्सव” : नगरसेवक योगीराज गाडे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : दिवाळीचा सण जवळ आला असताना, नागरिकांनी स्वदेशी आणि स्थानिकांना प्राधान्य...

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या बसला भीषण आग, २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण...

झेडपीसाठी मोठी अपडेट, 28 ऑक्टोबरला अंतिम…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै...

आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

जवळा जिल्हा परिषद गटात रस्सीखेच | सुजित झावरे, दीपक लंके, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत,...