spot_img
अहमदनगरअहमदनगर: गोळी सेंटरवर धाड; हाती लागले घबाड..

अहमदनगर: गोळी सेंटरवर धाड; हाती लागले घबाड..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड येथील बीड रोडवरील गोळी सेंटर मध्ये बेकायदेशीर विक्री करत असलेल्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकुन 26 हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. या प्रकरणी दोघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आसुन एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना देखील जामखेड तालुक्यात गुटखा विक्री होत आहे. याबाबत ची माहीती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली असल्याने या पथकाने दि 3 रोजी जामखेड शहरातील बीड रोडवरील जय भगवान गोळी सेंटर याठिकाणी छापा टाकला यामध्ये 26 हजार 560 रु कीमतीचा गुटखा पानमसाला आढळून आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी निलेश श्रीराम कोल्हे रा. राजुरी ता. जामखेड व अशोक गोरख गीते रा.मांजरी, ता पाटोदा जिल्हा बीड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये पहील्या निलेश श्रीराम कोल्हे या आरोपीस अटक करण्यात आली असून आशोक गोरख गीते हा फरार झाला आहे. फरार आरोपीस पोलीस कधी पकडतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी निलेश श्रीराम कोल्हे यास न्यायालयात नेले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ हे करत आहेत. जामखेड तालुक्यात राजरोसपणे अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत आहेत. याबाबत नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येऊन कारवाई केली मात्र स्थानिक पोलिसांना हे दिसून येत नाही का अशी चर्चा नागरिकांमधून होत आहेत. आतातरी तालुक्यात कायमस्वरूपी गुटखा बंदी होणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...