spot_img
अहमदनगरअहमदनगर: आधी गाडीवर फिरवल, नंतर लॉजवर नेलं; नर्सिंग कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थिनीसोबत जे...

अहमदनगर: आधी गाडीवर फिरवल, नंतर लॉजवर नेलं; नर्सिंग कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थिनीसोबत जे घडलं ते भयंकर!

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नर्सिंग कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थिनीला “तू माझ्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर का बोलत नाहीस, माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये का राहात नाहीस” असे म्हणत एका तरुणाने मारहाण केली आणि लॉजवर नेले. या घटनेत रोशन वाघ (रा. यवतमाळ जिल्हा) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर तरुणी ही यवतमाळ जिल्ह्यातील असून तिची रोशन वाघ याच्याशी चार वर्षांपासून ओळख होती. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तरुणी श्रीरामपूर येथे नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती. कॉलेजच्या आवारात असताना रोशनने तिला मोटारसायकलवर बसण्याची मागणी केली. पेपर चालू असल्याने तिने नकार दिला, तेव्हा रोशनने बळजबरीने तिला मोटारसायकलवर बसवून शहरातील एका लॉजवर नेले.

लॉजवर रूममध्ये नेऊन “तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये का राहत नाहीस? तू माझ्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर का बोलत नाहीस?” असे म्हणून तिला मारहाण केली आणि तिचा मोबाईल बंद केला. नंतर तिला बाभळेश्वरला नेले आणि बराच वेळ फिरवले.

दरम्यान, मुलीचा फोन बंद असल्याने तिच्या वडिलांनी स्थानिक पोलिसांना कळवले. स्थानिक पोलिसांचा फोन आल्यानंतर रोशनने सदर तरुणीला रात्री ८ वाजता पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडले. तरुणीच्या तक्रारीनुसार, रोशन वाघ (रा. यवतमाळ जिल्हा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...