spot_img
अहमदनगरAhmednagar: महिलेच्या खात्यातून पैसे काढले; मामा-भाचे अडकले

Ahmednagar: महिलेच्या खात्यातून पैसे काढले; मामा-भाचे अडकले

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री –
चेकचा गैरवापर करून मामा-भाच्याने महिलेच्या खात्यातून दोन लाख 92 हजार रूपये काढूनघेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रकरणी भाचा सचिन भाऊसाहेब म्हस्के व मामा संजय गोरक्ष आमले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हस्के व आमले यांनी फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करून आयसीआयसी बँकेच्या एमआयडीसी शाखेत अर्ज करत त्यांचे खाते उघडले. त्या खात्यावर चार लाख रूपयांचे कर्ज मंजूर करून घेतले.

कर्ज जुने-नवे करण्याच्या बहाण्याने म्हस्के यांनी मामा आमले याच्या खात्यावर चेक जमा करून एकुण दोन लाख 92 हजार रूपये काढून घेतले. फिर्यादी यांनी म्हस्के व आमले यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास वेळोवेळी टाळाटाळ केली.

फिर्यादी महिलेने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोन गटात राडा! शेतातला वाद पेटला पुढे नको तोच प्रकार घडला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निमगाव वाघा शिवारात पाइपलाइनच्या किरकोळ वादातून दोन गटात राडा झाल्याची...

नगरमध्ये दोस्तीत कुस्ती! मित्रांचा मित्रावर हल्ला; दिल्ली गेट परिसरात खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री दुचाकी आडवी लावण्याच्या वादातून मित्रांनी मित्रावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची...

पारनेर हादरले! बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

तालुक्यात एकाच आठवड्यात दुसरी घटना; वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक पारनेर / नगर सह्याद्री पारनेर...

अ‍ॅपल कंपनीचे सरप्राईज; आज iPhone 17 होणार लाँच; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

iPhone 17 Launch 2025 अ‍ॅपल कंपनीने ९ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता iPhone 17...