श्रीरामपूर / नगर सह्याद्री : श्रीरामपूर येथील अतिथी कॉलनीत झालेल्या मृत्यूच्या बनाव आता उघड झाला आहे. पतीच्या डोक्यात रॉड मारून पत्नीचेन निर्घृण हत्या केली आहे. पती दररोज दारू पिऊन त्रास देत असल्यानेच हत्या केल्याची कबुली पत्नीने दिली आहे.
संजय गवुजी भोसले, (वय ४० वर्षे, रा. अतिथी कॉलनी, वार्ड नं.०१, श्रीरामपूर) यांची हत्या झाली असून संगिता संजय भोसले (वय ३८ वर्षे, धंदा नर्स, रा. अतिथी कॉलनी, वार्ड नं. ०१, श्रीरामपूर) या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी : घराच्या पायरीवरुन पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागून मृत्यू झाला वगैरेच्या माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मयत इसमाच्या मृत्यूबाबत पोलीस पथकास संशय आल्याने, सदर घटनास्थळाची पाहणी करुन, मयताच्या डोक्यास झालेल्या जखमाबाबत डॉक्टारांकडून माहिती घेतली.
सदरच्या जखमा पायरीवरुन पाय घसरुन पडून झालेल्या नसून त्या शस्त्राने झाल्याचे सांगितले. त्यानंतर मयताच्या पत्नीस ताब्यात घेऊस तपास केला असता तिने सांगितले की, पती हे मला दारू पिऊन नेहमी त्रास देत व माझ्यावर संशय घेत. त्यामुळे नेहमी वाद होत होते.
३१ डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस असल्याने खूप जास्त दारु पिऊन आले. मुलासमोर शरीरसंबंधाची मागणी करत होते. नकार दिल्याने संशय घेऊन शिवीगाळ करत होते.
पहाटे लघुशंकेकरीता बाहेरील वरंड्यात उभे राहिले असता, त्यांना ढकलुन देत खाली पाडले. कामाच्या पिशवीमध्ये असलेल्या टॉमीसारखा रॉड काढून डोक्यात पाच सहा वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, आरोपीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.