spot_img
अहमदनगरAhmednagar Breaking : जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर संगमनेरात भव्य आंदोलन, आंदोलकांनी केली 'ही'...

Ahmednagar Breaking : जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर संगमनेरात भव्य आंदोलन, आंदोलकांनी केली ‘ही’ मागणी

spot_img

संगमनेर / नगर सहयाद्री : जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी महाराष्ट्र सरकारच्या समन्यायी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून प्रवरा खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडी सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करावे अशी मागणी केली.

संगमनेर बस स्थानक येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे भव्य आंदोलन झाले. यावेळी बाबासाहेब ओहोळ, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, लक्ष्मणराव कुटे, सुरेश थोरात, निर्मलाताई गुंजाळ, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, राजेंद्र गुंजाळ, संतोष हासे, विलास कवडे,

नवनाथ आरगडे, राजेंद्र चकोर, रोहिदास पवार, बाळासाहेब गायकवाड, गजेंद्र अभंग, आनंद वर्पे, विलास नवले, हृतिक राऊत, भाऊसाहेब शिंदे, चंद्रकांत कडलग, विक्रम थोरात, डॉ. तुषार दिघे, प्रमोद हासे, बापूसाहेब गिरी, प्रा, बाबा खरात, अर्चना बालोडे, पद्माताई थोरात, तात्याराम कुटे, मिनानाथ वर्पे, जावेद शेख, नाना वाघ, सुनील कडलग, राजेंद्र कडलग आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन कायदा 2005 हा प्रामुख्याने दुष्काळी भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना समन्यायीपणे पाणी वाटप होण्याच्या उद्देशाने झालेला आहे. भंडारदरा व निळवंडे धरणातील कार्यक्षेत्रात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने या परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे पाणी येथील शेतकऱ्यांना देणे पहिले प्राधान्य आहे.

असे असताना कायद्याच्या चुकीचा अर्थ काढून भंडारदरा व निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडी धरणासाठी नेणे हे अत्यंत दुर्दैवाचे आहे.याबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असून त्या अगोदरच पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे हे पाणी तातडीने बंद करावी अशी आग्रही मागणी आहे.

यावेळी बाबा ओहोळ म्हणाले की, भंडारदरा व निळवंडे धरणातील पाणी हे या भागातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी आहे समन्यायी पाणी वाटपांमधून अगोदर या भागातील दुष्काळी जनतेला पाणी दिले पाहिजे असा अर्थ आहे. यावर्षी मराठवाड्यात आपल्यापेक्षा जास्त पाऊस झाला असून केवळ चुकीचा अर्थ वापरून पाणी सोडण्याचे काम होत आहे.

याबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून दर तीन वर्षांनी या आदेशाचे पुनर्लोकन करून सूत्रात बदल करणे अशी कार्यवाही करावी अशी आदेश आहेत मात्र यामध्ये शासनाने काहीही केलेले नाही. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी आवाज उठवला असून या कायद्याला तीव्र विरोध केला आहे. याशिवाय 2005 च्या कायद्यातील कलम 31 अन्वये ज्या धरणांचे डेलीनेशन झालेले नाही. ती धरणे कायद्याच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत त्यामुळे जायकवाडी, भंडारदरा व निळवंडे हे धरणाचे अद्याप डेलीनेशन झालेली नसल्याने ते या कायद्याच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही हा कायदा या धरणांवर लावला गेला असून हे उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्यावर अन्याय करणारे ठरले आहे.

मिलिंद कानवडे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या सूत्रात बदल करावे अशी मागणी वेळोवेळी केली जात आहे. मात्र सत्ताधारी वेळ काढूपणा करत आहेत. या कायद्यात तातडीने बदल करून जायकवाडी धरणासाठी सोडलेले पाणी बंद करावे अन्यथा शेतकरी तीव्र स्वरूपात आंदोलन करतील व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही ते म्हणाले.

रामहरी कातोरे म्हणाले की, य शासनाने जायकवाडीचे पाणी सोडणे बंद न केल्यास धरणावर जाऊन चाके बंद करण्यात येतील याप्रसंगी नवनाथ आरगडे, रमेश गुंजाळ, सुभाष सांगळे,विलास कवडे, सौ निर्मलाताई गुंजाळ, प्रा बाबा खरात यांनी मनोगत व्यक्त केली. हे निवेदन शासनाच्या वतीने नायब तहसीलदार लोमटे यांनी स्वीकारले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...