अहमदनगर । नगर सहयाद्री
शहरातील झेंडीगेट परिसरातील कुरेशी मोहल्ला, आंबेडकर चौकातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन हजार सहाशे साठ किलो गोमास जप्त करत ११ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात आठ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत २५ लाख ६८हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शोएब रौफ कुरेशी, फैसल अस्लम शेख, अदनान फिरोज कुरेशी, मुसाविर इन्नुस कुरेशी, ओवेस रशिद शेख, अल्तमश अस्लम कुरेशी, सर्व ( रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर ) यांना ताब्यात घेतले असून फैजान इद्रिस कुरशी, सुफियान ऊर्फ कल्लु इद्रिंस कुरेशी ( रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर) हे दोघे फरार आहे.
अधिक माहिती अशी: पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमास वाहतुक व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला झेंडीगेट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये जिवंत गायीचे कत्तल करून गोमास विक्रीहोत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत झेंडीगेट परिसरातून ७ लाख ९८ हजार रुपये किंमतीचे दोन हजार साहसे शांत किलो वजनाचे गोमास, ७ लाख,७० हजार रुपये किंमतीची ११ गोवंश जातीची जिवंत जनावरे, 6 लाख रुपये किंमतीचा १ पांढरे रंगाचा महिंद्रा पिकअप टेम्पो, ४ लाख रुपये किंमतीचा १ अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व ४०० रुपये किंमतीचे लोखंडी सुरी व सत्तुर असा एकुण १५ लाख ६८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार भाऊसाहेब काळे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, सचिन अडबल, संतोष लोढे, संतोष खैरे, रविंद्र घुगांसे, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे यांच्या पथकाने केली आहे.