spot_img
अहमदनगरअहमदनगर: फसवणुकीचा अजब फंडा! व्यावसायिकाला घातला तीन लाखाला गंडा? वाचा सविस्तर..

अहमदनगर: फसवणुकीचा अजब फंडा! व्यावसायिकाला घातला तीन लाखाला गंडा? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री: –
हुंडई कंपनीची डिलरशीप देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची दोन लाख 95 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. संजय दशरथ वाघ (वय 50, रा. कॉटेज कॉर्नर, आठरे पाटील पब्लिक स्कूल जवळ, सावेडी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

त्यांनी मंगळवारी (30 जुलै) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात एका मोबाईल नंबरवरील विष्णू जैन (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाघ यांचे कॉटेज कॉर्नर परिसरात चारचाकी वाहन दुरुस्तीचे वर्कशॉप आहे.

11 जुलै 2024 रोजी वाघ वर्कशॉपवर असताना त्यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. त्या व्यक्तीने आपले नाव विष्णू जैन सांगून वाघ यांना हुंडई कंपनीची डिलरशीप देण्याचे आश्वासन दिले. त्या व्यक्तीने हुंडई कंपनीच्या नावाने बनविलेल्या बनावट मेलवरून वाघ यांना मेल पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

डिलरशीपसाठी प्रोसेसिंग फी म्हणून दोन लाख 95 हजार रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले व खाते क्रमांक पाठविला. वाघ यांनी त्या खात्यावर दोन लाख 95 हजार रुपये जमा केले. परंतु, त्यानंतरही वाघ यांना हुंडई कंपनीची डिलरशीप मिळाली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाघ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 318 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार प्रदीप बडे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...