spot_img
अहमदनगरAhmednagar: दोन गटात तुफान राडा!! कारण काय ?

Ahmednagar: दोन गटात तुफान राडा!! कारण काय ?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
दुचाकी पार्किंगवरून दोन गटात वाद होऊन हाणामारीची घटना रविवारी (दि. २८) भिंगार शहरात घडली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मारहाण; विनयभंग कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

३६ वर्षिय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात विनयभंग, मारहाण कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने दुचाकी पार्किंग केल्यानंतर संशयित आरोपींनी तुम्ही गाडी येथे का लावली असे म्हणून मारहाण केली.फिर्यादीशी गैरवर्तन केले.

फिर्यादीचे पती व सासू यांना मारहाण करण्यात आली. ३५ वर्षिय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पती-पत्नी विरोधात विनयभंग, मारहाण कलमान्वये गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या पतीने संशयित आरोपींना दुचाकी लावण्यास विरोध केल्याने त्यांनी मारहाण केली. फिर्यादीसोबत गैरवर्तन केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागेश भोसले टोळीविरुद्ध ‘मोक्का’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गंभीर स्वरूपाचे १६ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार नागेश विक्रम भोसले...

डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; कुठे घडली घटना?

संगमनेर । नगर सहयाद्री:- शेतातील बागेत डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना...

अहिल्यानगर: वेटरने घेतला हॉटेलमध्ये गळफास; कारण आलं समोर..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- पती-पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नी रागाच्या भरात घरातून बाहेर निघून...

आजचे राशी भविष्य! चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...