संगमनेर । नगर सहयाद्री
तालुक्याच्या साकूर पठारभागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीवर तरुणाने तोंडाला रुमाल बांधून व हातपाय बांधून लैंगिक अत्याचार केल्याची धकादायक घटना २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी घडली होती. त्यानंतर धक्का बसल्याने तरुणीने विषारी पदार्थ सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी घारगाव पोलिसांत रविवार दि. १७ मार्च रोजी अत्याचार करणारा तरुण आणि मदत करणाऱ्या चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मयत तरुणी ही दहावीच्या परीक्षेसाठी प्रबेशपत्र काढण्यासाठी आजोबांसोबत साकूरमध्ये गेली होती. मात्र, शाळेला सुट्टी असल्याने मैत्रिणीसोबत घरी निघाली होती. त्याचवेळी साहित्य घेण्यासाठी ती दुकानात गेली. यावेळी तोंडओळखीचा सौरभ खेमनर हा तरुण रुबाब पानशॉपजवळ उभा होता. त्याने या मुलीला अडवूनआणि हाताला धरून बळजबरीने रुबाब पानशॉपमध्ये घेऊन गेला. त्यास प्रतिकार करण्यासाठी हात सोड नाही तर आरडाओरड करेल असे ती म्हणाली, परंतु, त्याने तोंड दाबून दुकानात नेले आणि अत्याचार केला.
मुलीने संपूर्ण आपबिती आपल्या आईला सांगितली, धीर देत आपण वडिलांना सांगू असे आई म्हणाली. त्यानंतर आई घराबाहेर आली असता तिला मोठा धक्का बसल्याने तिने विषारी पदार्थ सेवन केला. तिला उपचारांसाठी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर (दोघे रा. हिरेवाडी, साक्कूर), प्रशांत भास्कर भडांगे (रा. मडांने बस्ती, साकूर), विकास रामदास गुंड (रा.गुंडवस्ती, मांडवे बु.) विजय खेमनर (दोघे रा. हिरेवाडी, साकूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे.