spot_img
ब्रेकिंगअहमदनगर : मित्राने व्यायामाला मारली दांडी..१० ते १५ जण भल्या पहाटेच घुसले...

अहमदनगर : मित्राने व्यायामाला मारली दांडी..१० ते १५ जण भल्या पहाटेच घुसले घरात..त्यानंतर..साऱ्या कॉलनीने जोडले हात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी व्यायमाला अनेक दिवसापासून दांडी मारणाऱ्या मित्राला चांगलीच अद्दल घडवली. त्यांनी त्याच्या घरावर पहाटेच मोर्चा वळविला. मित्राच्या घराबाहेर असलेले दार, भांडे-कुंडे वाजवून त्याला गाढ झोपेतून उठवून त्याला मैदानावर घेऊन जाण्यात आले. पहाटेच सुरु झालेल्या भांड्यांच्या आवाजाने संपूर्ण कॉलनीच जागी झाली होती.

मित्र आपली साथ देतात तसे वेळेला कानही पिळतात. असाच प्रकार भिंगारमध्ये घडला. अशोक लोंढे (वय-54) यांचे हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी त्यांना नियमीत व्यायाम करण्याचा सल्ला दिला. मात्र वाढत्या थंडीमुळे सकाळी उठणे होत नसल्याने त्यांनी व्यायामाला दांडी मारण्यास सुरुवात केली. आपला ग्रुपचा सदस्य अनेक दिवसापासून येत नसल्याने लक्षात आले. सर्व सदस्यांनी पहाटे त्यांच्या घरी जाऊन त्याला उठवण्यासाठी भन्नाट युक्ती वापरली. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अविनाश जाधव, विठ्ठलराव राहिंज, रमेश वराडे आदी मित्रांनी त्याच्या घराकडे धाव घेतली.

पहाटेच दहा ते वीस सदस्य मित्राला घरी उठविण्यासाठी आल्याने लोंढे कुटुंबीयांची चांगलीच बंभेरी उडाली. हात जोडून दाराबाहेर पडलेल्या मित्राला तसेच गाडीवर बसवून व्यायामासाठी मैदान गाठण्यात आले. कॉलनीतील नागरिकांना नेमकं काय प्रकार आहे? हा समजल्यानंतर प्रत्येकाला हसू आवरेना. दिवसभर परिसरात या विषयावर चर्चा रंगली होती. पण आता यानंतर तरी हा मित्र सकाळी व्यायामासाठी न चुकता जाणार हे मात्र नक्की.

संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुप हे एक कुटुंब बनले असून, सर्व सदस्य एकमेकांची काळजी घेऊन त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. मात्र काही सदस्य दांडी मारु लागल्यास त्यांना इतर सदस्य मैदानावर घेऊन येत आहे. अशोक लोंढे यांनी सर्व सदस्यांनी घरी पहाटेच एकत्र येऊन उठविल्याने एक वेगळा सुखद धक्क बसला. धावपळीच्या जीवनात व्यायाम आवश्‍यक असून, मित्रांनी घेतलेली काळजी नक्कीच प्रेरणा देणारी ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...