spot_img
अहमदनगरAhmedanagr News : 'या' उड्डाणपुलावर अपघात, एक ठार

Ahmedanagr News : ‘या’ उड्डाणपुलावर अपघात, एक ठार

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर – सोलापूर महामार्गावरील शिरढोण उड्डाणपुलावर बोलेरो व डंपर यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये बोलेरोचालक जागीच ठार झाला.

मंगेश दिलीप नागवडे (रा.गुणवडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका संपण्याचे नाव घेईना. नगर तालुक्यातील अपघाताच्या काही घटना ताजा असतानाच आज हा भीषण अपघात झाला.

शनिवारी (दि.१६ डिसेंबर) सकाळी १० च्या सुमारास शिरढोण उड्डाणपुलावर बोलेरो जीप व डंपर यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बोलेरोचा चालक मंगेश दिलीप नागवडे हा जागीच ठार झाला.

डंपर चालक जखमी झाल्याचे समजते. अपघात इतका जोराचा होता की, बोलेरो जीपच्या पुढील भागाचा चुराडा झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दुपारी उशिरापर्यंत पोलिसांचे तपासकार्य सुरु होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...