spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग: दरोडा घालणारी टोळी गजाआड: 'असा' लावला सापळा

अहमदनगर ब्रेकिंग: दरोडा घालणारी टोळी गजाआड: ‘असा’ लावला सापळा

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री-
पारनेर तालुक्यातील राजणगाव मशिद येथे कुटुंबाला लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोकड लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासातच गजाआड केले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, दुचाकी व हत्यारे असा दोन लाख ६८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

रमेश ऊर्फ मुकेश सिताराम भोसले (वय ३०), त्याचे साथीदार दिनेश वतऱ्याब भोसले (वय ३३), सागर पानतास भोसले (वय २२), शशिकांत ऊर्फ सौवधा सिताराम भोसले (वय २४), बसिम बतन्ऱ्याब भोसले (वय १९), राहुल रवी भोसले (वय २४, सर्व रा. विठ्ठलवाडी रस्ता, कामरगाव ता. नगर) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: वसंत गणपत जवक (वय ३६, रा. रांजणगाव मशिद) हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना अनोळखी सहा जणांनी त्यांना लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण केली होती. त्यांच्याकडील दोन लाख ४८ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकासह भेट दिली. अधीक्षक ओला यांनी तपासाबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना सूचना केल्या होत्या.दरम्यान सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रमेश भोसले याने त्याच्या इतर साथीदारांसह केला असुन तो कामरगाव शिवारातील हॉटेल संतोष जवळ येणार आहे, अशी माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

पथकाने हॉटेल संतोष येथे सापळा लावून संशयित रमेश ऊर्फ मुकेश सिताराम भोसले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता इतर साथीदार दिनेश भोसले, सागर भोसले, शशिकांत भोसले, बसिम भोसले, राहुल भोसले व पायल काळे यांच्या मदतीने रांजणगांव मशिद तेथील कुटुंबाला मारहाण करून लुटल्याची कबूली दिली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार घाकराव, उपनिरीक्षक समाधान भाटेबाल, अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, संदीप दरंदले, फुरकान शेख, मच्छिद्र बड़े, रवींद्र घुगांसे, रोहित येमुल, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, जालिंदर माने, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर, महिला अंमलदार भाग्यश्री मिटे, ज्योती शिंदे यांच्या पथकांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...