Maharashtra Crime News: रक्तचंदनाची कंटेनरमधून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन चंदनतस्करांनापुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी-चिंचवड पोलीसांनी पकडले. त्यांच्याकडून २५ कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात आले. या तस्करीचा मास्टरमाइंड आहिलयनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील असल्याची माहिती उजेडात आली आहे. राजाराम गंगाराम गावखे वय ३७ ( रा. काळेवाडी, सावरगांव ता. पारनेर) व हरप्रितसिंग धरमसिंग बदाना ( रा. ठाणे)यांना ताब्यात घेतले आहे.
पुणे-मुंबई दूतगती महामार्गावरून कोट्यावधी रूपयांच्या रक्तचंदनाची तस्करी होणार असल्याची माहीती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी द्रुतगती मार्गावरील उसें टोलनाक्यावर सापळा लाऊन सिलबंद असलेल्या चाळीस फुट कंटेनर पकडला.
कंटेनरसोबत असलेल्या इतर व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली, कंटेनर चालक तसेच त्यासोबत असलेल्या इतरांकडून प्रतिसन न मिळाल्याने पोलिसांनी वन विभागाचे अधिकारी तसेच पंचांसमक्ष कंटेनरचे सैल तोडून पाहणी केली असता त्यात तब्बल २५ कोटी रूपये किंमतीचे रक्तचंदन आढळून आले.