spot_img
अहमदनगरअहिल्यानगरकरांनो सावधान! जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट, कधीपर्यंत पहा...

अहिल्यानगरकरांनो सावधान! जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट, कधीपर्यंत पहा…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सून पूर्व दमदार पाऊस होत आहे. त्यातच आता पुन्हा भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.

भारतीय हवाान खात्याच्या इशार्‍यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात दि. 22 मे 2025 रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, गडगडाटासह वादळी वारा, वीज पडण्याची शक्यता आहे. तसेच दि. 23 मे 2025 रोजी काही ठिकाणी गडगडाटासह वादळी वारा, वीज पडणे तसेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दि. 24 मे 2025 व दि. 25 मे 2025 रोजी वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहिल्यानगर यांनी केले आहे.

मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅयटर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/ सायकल यांचेपासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉर्न्सॉजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात लक (होर्डिंग्ज्) कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात लकांच्या (होर्डिंग्ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जीनीशी कीतकी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे, नदी अथवा ओढे-नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये.
जुनाट/ मोडकळीस आलेल्या व घोकादायक इारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शययतो टाळावे.

वादळी वारा व पाऊस याुळे शेतीालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेताल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेताल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज व पाऊस यांपासून स्वत।चे व त्यांच्या जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला...

अतिवृष्टीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा, कुठे केली पाहणी पहा

ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर / नगर सह्याद्री जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या...

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पावणेतीन लाखांचा गंडा;

माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'अंतर्गत सोलर पॅनल...