spot_img
अहमदनगर'अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर'

‘अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर’

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये मार्च 2025 या महिन्यात अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यापूव जानेवारी महिन्यात दहावा क्रमांक मिळवला होता. दोन महिन्यात केलेल्या उपाययोजनांमुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये महानगरपालिकेने स्थान मिळवले आहे. लवकरच आरोग्यवधनी केंद्रे सुरू करून नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

महानगरपालिकेने माता मृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, कुटुंब नियोजन, बालकांचे आरोग्य, आरोग्य केंद्र, शासकीय योजनांची अंमलबजावणी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आशा कार्यक्रम, ई औषधी, माता आणि बाल आरोग्य सुधारणा, लसीकरण कार्यक्रमांचे व्यापक आयोजन, संक्रामक व असंक्रामक रोग नियंत्रणासाठी विशेष उपक्रम, तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य व्यवस्थापन अशा विविध उपाययोजना व कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे महानगरपालिकेला 40.94 गुण मिळाले व राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये पाचवे स्थान मिळवले.

आरोग्य विषयक उपाययोजना व सुधारणा करण्यासाठी सातत्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन उपक्रम हाती घेतले जात आहेत. येत्या काळात पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या उपाययोजना व सेवा देण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत आहे. शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अभियानातून शहरात आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. आणखी सहा केंद्रे लवकरच सुरू होतील. त्यातून चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...