spot_img
अहमदनगरअहिल्यानगर: मैं आज जुवे मे पैसे हारा! पती संतापला; पुढे घडलं भयंकर...

अहिल्यानगर: मैं आज जुवे मे पैसे हारा! पती संतापला; पुढे घडलं भयंकर…

spot_img

अहिल्यानगर |नगर सहयाद्री:-
भरदिवसा नशेडी पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली. याप्रकणी पत्नीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती दसरथ रामकेश निसाद ( रा. शिवाजीनगर, कल्याण रोड, ता. जि. अहिल्यानगर ) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कटूंबासह शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुले आहेत. कटुबांचा प्रसिद्ध इडली सांबरचा व्यवसाय आहे. मात्र पतीला दारूचे व्यसन आहे. व्यसनी पती अनेकदा फिर्यादी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करायचा. ८ जानेवारी रोजी पतीने मैं आज जुवे मे पैसे हारा हु और मैं तुझे और नही संभाल सकता, तु तेरे माँ बाप के घर जा असे म्हणत धारधार शस्राने फिर्यादी पत्नीच्या उजव्या डोळ्याचे वर वार केले.

त्यानंतर पत्नीला रक्तबंबाळ अवस्थेत ठेवून पळ काढला. डोळ्यातुन रक्त आल्याचे पाहुन कटूंबातील सदस्यांनी फिर्यादीला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर फिर्यादी पत्नीने पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसारआरोपी पती विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘डबल’ परताव्याचे आमिष पडले महागात; नगरच्या ३ व्यावसायिकांना ७० लाखांना गंडवले!, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, श्रीगोंदा येथील...

जगताप-कोतकर कुटुंबात श्रद्धा- सबुरी हीच कर्डिलेंना श्रद्धांजली

सारिपाट / शिवाजी शिर्के प्रस्थापितांच्या विरोधात लढताना कधी थोरातांना तर कधी विखेंना घाम फोडणाऱ्या शिवाजीराव...

शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूनंतर जरांगेंही आक्रमक, आंदोलनकर्त्यांनी घेतला टोकाचा निर्णय; मुख्यमंत्री म्हणाले…

'कर्जमाफीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत...; बच्चू कडू अन् समर्थकांचं 'रेल रोको' आंदोलन, नागपूर /...

मंत्री विखे पाटील यांचे संगमनेर तालुक्‍यातील कार्यकर्त्‍यांना मोठे अवाहन; स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या निवडणूकीतही..

संगमनेर । नगर सहयाद्री:- आपल्‍या सर्वांच्‍या योगदानामुळे राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार सत्‍तेवर आले. लोकांसाठी...