spot_img
अहमदनगरअहिल्यानगर : कलाकेंद्र फोडणारी टोळी जेरबंद; आलिशान स्कॉडा गाडीत आढळले गावठी कट्टे..

अहिल्यानगर : कलाकेंद्र फोडणारी टोळी जेरबंद; आलिशान स्कॉडा गाडीत आढळले गावठी कट्टे..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
जामखेड येथील रेणुका कलाकेंद्रात तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ०१ गावठी कट्टा, ०३ जिवंत काडतुसे आणि स्कॉडा कंपनीची पांढऱ्या रंगाची कार असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीमध्ये अक्षय किशोर बोरुडे, शहनवाज अन्वर खान, जयसिंग दादापाटील लोंढे, अविनाश भास्कर शिंदे, गणेश सचिन शिंदे, ऋषिकेश यौसेफ गरुड, सर्व ( रा.तिसगांव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) अनिकेत ऊर्फ बाळा नितिन कदम ( रा. एमआयडीसीरोड, ता. आष्टी, जि.बीड ) यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: जामखेड शहराच्या लगत असणाऱ्या रेणुका कलाकेंद्रावर एकाच आठवड्यात दोन वेळा तोडफोड करत राडा घेतल्याची घटना घडली होती. खंडणीचा गुन्हा दाखल असतानाही मुख्य आरोपीसहवरील आरोपींनी कलाकेंद्रावरील सात-आठ गाड्यांची तोडफोड केली होती. याशिवाय कलाकेंद्रातील महिलांना बेदम मारहाण देखील केली होती. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खंडणी, विनयभंग व आर्म अँक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेस विशेष कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तपास करत आरोपी अक्षय किशोर बोरुडे (रा. तिसगाव, पाथर्डी) याला ताब्यात घेतले असता, त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली. अनिकेत कदम यास स्कॉडा गाडीसह पाटोदा परिसरातून ताब्यात घेतले असता त्याच्याकडून गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे सापडली गुन्ह्यातील अन्य आरोपींपैकी ११ आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

त्यांची नावेदिपक यौसेफ गरुड, शिवम भारत आठरे, किशोर शिवाजी जाधव, अक्षय राजेंद्र जायभाय, रोहीत दिलीप खंदारे, आशिष हरीभाऊ साळवे, संतोष लोंढे, पुर्ण नाव माहित नाही सर्व ( रा. तिसगांव, ता पाथर्डी ), अमोल महाडीक, पुर्ण नाव माहिती नाही ( रा. पारेवाडी, ता पाथर्डी ) अभि मते, पुर्ण नाव माहित नाही, (रा. नेवासा ता नेवासा) अभि मते याचा मित्र नाव माहित नाही यांच्यासह सचिन मधुकर लोखंडे ( रा. आष्टी, ता. आष्टी जि. बीड ) असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोहेकों सुरेश चंद्रकांत माळी, पोहेका दिपक भास्कर घाटकर, पोहेको हृदय गौतम घोडके, पोहेका लक्ष्मण चिंधु खोकले, पोहेकॉ फुरकान अब्दुल मुजीब शेख, पोना श्यामसुंदर अंकुश जाधव, पोकों प्रकाश नवनाथ मांडगे, पोका सागर अशोक ससाणे, पोकों रोहीत अंबादास यमुल, पोकों भागवान बाळासाहेब थोरात, पोकों सतिष पोपट भवर, पोकॉ विशाल अण्णासाहेब तनपुरे, पोकों प्रशांत राम राठोड, मपोकों सोनल भागवत, पोहेका अर्जुन बडे यांनी बजावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस...

आरक्षणामुळे कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर | स्थानिक राजकारणात होणार उलथापालथ अहिल्यानगर ।...

पारनेर पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली...

खासदार संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल

MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....