spot_img
अहमदनगरअहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या घरी दोन मद्यधुंद तरुणांनी राडा घालत मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोन तरुणांपैकी एक जण मारहाण करतांना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी अजय महाराज बारस्कर यांनीएमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी: अजय महाराज बारस्कर हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगेयांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं चर्चेत आले होते. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा येथे अजय महाराज बारस्कर वास्तव्यास आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या घरी काळ रात्री दोनमद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घालत मारहाण केल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर अजय महाराज बारस्कर यांनी मद्यधुंद तरुण मनोज जरांगे यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे.

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?
अजय महाराज बारस्कर यांच्या घरी ते दोघे मद्यधुंद तरुण येतात त्यावेळी अजय बारस्कर यांची आई तिथं बसलेली असते. त्यानंतर तिथं बारस्कर यांच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती येतो. हे पाहताच दोन तरुणांपैकी एक जण त्या व्यक्तीला मारहाण करतो. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यासंबंधीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिल्याची माहिती अजय महाराज बारस्कर यांनी दिली आहे.

मद्यधुंद तरुण मनोज जरांगे यांचे समर्थक
अजय महाराज बारस्कर यांनी घरामध्ये येऊन धिंगाणा घालणारे दोन मद्यधुंद तरुण मनोज जरांगे समर्थक असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. घराच्या बाजूला दुकान आहे, तिथं ऑफिसमध्ये बसलेलो होतो. मला फोन आला आणि घरी पळत गेलो. ते माझ्या घरात घुसले तेव्हा आई घरात बसलेली होती. मी घरी पोहोचलो तेव्हा ते तरुण माझ्या आईला आणि वयस्कर व्यक्तीला मारत होते. म्हाताऱ्या माणसांना आणि स्त्रीला मारण्याची संस्कृती आपली आहे का? असा सवाल बारस्कर यांनी जरांगे यांना केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...