spot_img
अहमदनगरअहिल्यानगर: सहायक आयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात; किती रुपयांची मागणी?

अहिल्यानगर: सहायक आयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात; किती रुपयांची मागणी?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भूजलाशयी पिंजरा मत्स्यसंवर्धन या प्रकल्पासाठीचे राहिलेले अनुदान सरकारकडून मिळावे यासाठी सरकारला प्रस्ताव पाठविण्यासाठी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या अहिल्यानगरचे मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) वर्ग-1चे सहायक आयुक्त रमेशकुमार जगन्नाथ धडील (वय-57) यांना 20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या संदर्भात 41 वषय पुरुष व्यक्तीने तक्रार केली होती.

यातील तक्रारदारांची पत्नी व बहीण यांच्या नावे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भूजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्प मंजूर झाला आहे. शासनाच्या अटी व शत प्रमाणे प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झालेले आहे. तक्रारदारांच्या पत्नीच्या नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून आज पावतो तीन लाख 88 हजार 800 रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच तक्रारदाराच्या बहिणीच्या नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून 29 लाख 16 हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे.

दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता शासनास प्रस्ताव पाठविण्याकरता आरोपी लोकसेवक अहिल्यानगरचे मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) वर्ग-1चे सहायक आयुक्त रमेशकुमार जगन्नाथ धडील यांनी अगोदर 40 हजार रुपये इतकी लाचेची मागणी केल्याची तक्रार 20 मार्च 2025 रोजी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार 20 मार्च रोजीच लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.

दरम्यान आरोपी लोकसेवक रमेशकुमार जगन्नाथ धडील यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता शासनास प्रस्ताव पाठविण्याकरता तक्रारदार यांच्याकडे 20 मार्च 2025 रोजी पंचासमक्ष 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार त्याच दिवशी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील गोरक्षनाथ आडसुरे यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाने सापळा आयोजित केला. तक्रारदाराकडून आरोपी रमेशकुमार धडील यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी रमेशकुमार धडील यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपाधीक्षक तथा तपास अधिकारी अजित त्रिपुटे यांच्या अधिपत्याखाली पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, चापोहेकॉ दशरथ लाड यांनी केली. त्यांना पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस अंमलदार उमेश मोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, चालक पोहेकॉ हारून शेख यांनी मदत केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...