spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगर: निंबळक शिवारात घडलं भयंकर; कंटेनर आला दुचाकींवर अन्..

अहिल्यानगर: निंबळक शिवारात घडलं भयंकर; कंटेनर आला दुचाकींवर अन्..

spot_img

अहिल्यानगर | नगर सहयाद्री
अहिल्यानगर येथील निंबळक शिवारात भरधाव कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत एक युवक ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत युवकाची ओळख रामलाल लल्लन यादव (रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) अशी झाली असून, जखमी युवकाचे नाव नंदकिशोर अशोक खंडागळे (वय २६, रा. एमआयडीसी बायपास, निंबळक, अहिल्यानगर) असे आहे.

फिर्यादी नंदकिशोर खंडागळे आणि रामलाल यादव हे दोघे होंडा अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (MH-16-DE-1715) वरून निंबळक शिवारातील जागे मळ्याकडे जात असताना सायंकाळी सुमारे ६:३० वाजता पाठीमागून येणाऱ्या अज्ञात कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात रामलाल यादव यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदकिशोर खंडागळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धडकेमुळे दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, कंटेनर चालकाने अत्यंत बेफिकीरपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत असताना हा अपघात घडवून आणला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 634/2025 नोंदवण्यात आला असून BNS कलम 106(1), 281, 125(ब), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134(अ)(ब), 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात कंटेनर व चालकाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धर्माच्या नावाखाली… ; घुलेवाडी येथील घटनेवर बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

संगमनेर / नगर सह्याद्री घुलेवाडी सप्ताह जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे....

दारू पिण्याची शर्यत बेतली जीवावर; एकाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री - सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) घडलेल्या...

नगरमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला सापळा

कृष्णा लॉजवर छापा | तिघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरातील बुरुडगाव रोडवरील कृष्णा लॉजवर कोतवाली...

पारनेरमध्ये बिबट्याचा हैदोस, कुठे घडला प्रकार पहा

निघोज | नगर सह्याद्री बिबट्याचा निघोज, गुणोरे, गाडिलगाव, कुंड, खंडोबा पाऊतके परिसरात हैदोस सुरू असून...