spot_img
अहमदनगर'अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतिदिनाचेे पंतप्रधान मोदी यांना सभापती प्रा. शिंदे यांचे...

‘अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतिदिनाचेे पंतप्रधान मोदी यांना सभापती प्रा. शिंदे यांचे निमंत्रण’

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पुण्यलोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतिदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि महासचिव विनोद तावडे यांची भेट घेतली. प्रा. शिंदे यांनी मोदी यांना अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे 31 मे 2025 रोजी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. यापूव राष्ट्रपती आले होते. आता पंतप्रधानही येतील अशी आशा असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांना माहिती दिली.

विधान परिषद सभापतिपदी प्रा. राम शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कुटुंबासमवेत दिल्ली दौरा केला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट दिली. व पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे वी जयंतीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने मला जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.

या पदाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल, असे याप्रसंगी शिंदे यांनी सांगितले. व त्यांना पुण्यलोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूत देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिंदे यांच्यासमवेत त्यांची आई भामाबाई, पत्नी आशा, जावई श्रीकांत खांडेकर, विवाहित मुलगी डॉ.सौ. अक्षता, मुलगा अजिंक्य व मुलगी डॉ.अन्विता उपस्थित होते.

पंतप्रधानांचा प्रा. राम शिंदेच्या आईसोबत मराठीतून संवाद
प्रा. राम शिंदे यांचे कुटुंब पहिल्यांदाच दिल्लीत आले होते. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कुटुंबाला भेट देणे आणि आईसोबत मराठीतून संवाद साधणे आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. ‌’काय सुरू आहे‌’, असे मोदी यांनी आईला मराठीतून विचारले. पंतप्रधानांनी 20-25 मिनिटे चर्चा केली असे सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....