spot_img
अहमदनगरअबब... थेट पोलिस निरीक्षकालाच मागीतली दोन कोटींची खंडणी! अहिल्यानगर पोलीस दलात मोठी...

अबब… थेट पोलिस निरीक्षकालाच मागीतली दोन कोटींची खंडणी! अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जुहू (मुंबई) येथे मेहुण्याच्या हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्ट आणि पुढे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या महिलेने जवळीक साधून थेट पोलिस निरीक्षकालाच गळाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओळख वाढवून घरगुती अडचणींचा बहाणा करत कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळल्याचेही समोर आले आहे. दराडे यांच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल करण्याआधी सदर महिला चार दिवस नगरमध्ये तळ ठोकून राहिली आणि या दरम्यान तिने दराडे यांच्याकडे व्हाटसअपवर मेसेज टाकून थेट दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचेही समोर आले आहे. दराडे यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ही रक्कम कमी करत पन्नास लाखांपर्यंत आणली गेल्याचेही समोर आले. सदरच्या महिलेविरोधात भिंगार कँप पोलिस ठाण्यात प्रताप दराडे यांच्या फिर्यादीवरुन खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

याबाबत प्रताप दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे मेव्हणे नरेंद्र थोरवे यांचे जुहू मुंबई येथे हॉटेल होते. सदर हॉटेल डिसेंबर 2024 पासून बंद केले आहे. माझ्या मेव्हण्याचे हॉटेल असल्याने व मी मुंबई येथे कामानिमीत्ताने जात असताना सदर हॉटेलवर येणे जाणे होते. मी हॉटेलवर गेलो असता अक्षय घाग यांनी रिसेप्शनिस्ट पदावर नेमणुकीस असलेली महिला हीचे सोबत ओळख करुन दिली. ती महिला कोलकत्ता पश्चिम बंगाल हल्ली मुंबई येथील असल्याचे सांगितले. माझा मेव्हणा हा त्याचे इतर व्यवसायामुळे बाहेर देशात राहत असल्याने मुंबई रेस्टॉरंट येथे काही अडचणी आल्यास जनरल मॅनेजर अक्षय घाग हे मला संपर्क करुन माहीती देत असत. हॉटेल कामा निमीताने त्यांनी माझेशी संपर्क सुरु केला तेव्हा माझ त्यांचेशी माझा संपर्क सुरु झाला. तेव्हा ती हॉटेलवरील काही अडचणी आल्यास माझ्या मेव्हण्यास माहीती देण्या करीता माझ्याशी संपर्क करु लागली होती.

तसेच हॉटेलमधील रोजचे घडामोडीवर बोलत होती. त्यामुळे आमचा संपर्क आणखी वाढला. तदनंतर मी कधी मुंबई येथे गेल्यास हॉटेलवर आमची भेट होत होती. तेव्हा सदराची महिला ही मला भेटून तुम्ही पोलीस दलामध्ये आहात मुंबई मधे तुमच्या ओळखी असतील तर मी मॉडेलींग करत आहे. तसेच मी ॲक्टर सुध्दा आहे. मी फिल्म इंडस्ट्रीमधे मी काम करते आहे माझे खुप काहीतरी करण्याचे स्वप्न आहे परीस्थीतीमुळे मला हा पार्ट टाईम जॉब करावा लागत आहे. असे सांगत असल्याने मला ती प्रामाणिक व होतकरु वाटली. सदर महिला ऑगस्ट 2023 मधे ती एकदा शुटींग करीता दुबई येथे गेली असता तीने मला फोन करुन माझे पैसे संपले आहेत व मला वीस हजाराची गरज असले बाबत कळवले व तुमचे पैसे मी भारतात आल्यानंतर परत देईल तेव्हा मी तीस माझ्या बँकेच्या खात्यातुन ऑनलाईन पध्द्तीने वीस हजार दिले होते. त्यानंतर ती काही ना काही गरजेचे कारण सांगून माझ्याकडून कधी पाच तर कधी दहा हजाराची मागणी करत असे तेव्हा मी तीस सरळ मनाने व तीला मदत करण्याचे उद्देशाने पैसे देत राहीलो.

सन डिसेंबर 2024 मधे माझे मेव्हणे नरेंद्र थोरवे यांनी त्यांचे हॉटेल बंद केले. त्यांनी हॉटेल बंद केल्याने त्यांचे हॉटेलमधील सर्वांचीच नोकरी गेली. त्यानंतर सदर महिला माझेशी संपर्क करु लागली. सध्या माझी परीस्थीती हलाकीची आहे. व माझ्याकडे रोजगार सुध्दा नाही. करीता आपण मला काहीतरी मदत करा असे म्हणुन तीने माझ्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा मी पैसे दिले नाहीत यासह वेगवेगळी कारणे सांगून माझ्याकडून पैसे घेत राहिली. सदरची महिला आपल्याला फसवत असल्याचे लक्षात आल्यानंतर मी तिचे फोन घेेणे बंद केले आणि तिच्याशी संपर्कही बंद केला. कोतवाली पोलिस ठाण्यात एक महिला आल्याचे आणि ती तुमची पत्नी असल्याचे सांगत असल्याचा फोन मला आला.

त्यानंतर मी पोलिस ठाण्यात आलो तर समोर तीच महिला दिसली. तेव्हा मी तीला म्हणालो की तू इथ काय करते आहेस तेव्हा तो मला म्हणाली की,तुम्ही एक तर माझे सोबत लग्न करा नाहीतर मला दोन करोड रुपये दया असे म्हणाली तसेच आपण लगेच आपले सर्व स्टाप समोर माझ्या गळयात हार घालुन लग्न करा नाहीतर मी येथे तमाशा करील अशी धमकी देवु लागली तेव्हा मी तीस स्पष्ट नकार दिला व तुला काय करायचे आहे ते तु कर असे म्हणालो असता ती मला म्हणाली की, तुम्हाला मी एक तास चान्स देते असे म्हणून निघुन गेलो व एक तासाने व्हॉटसपवर मला पैशाची व्यवस्था झाली का असे मेसेज करत होती तसेच कॉल करत होती तेव्हा मी तीला स्पष्ट नकार दिला व तुला काय करायचे ते कर असे म्हणालो. व आम्ही आमचे दैनंदिन कामकाज करत राहीलो.

सदर बाबत पोलीस स्टेशन सी सी टी व्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झाले आहे. यानंतर तीने सलग दोन दिवस मला मेसेज पाठवून पैशांची मागणी केली. दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सदर महिला ही पुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन येथे गेली व ती मला मेसेज करुन तम्हाला शेवटचा चान्स आहे मला मेसेज करत होती. त्यानंतर ती एफ आय आर न देता पुन्हा निघुन आली. व मला कॉल करुन तुम्हाला शेवटची संधी आहे. तुम्ही मला एक करोड रुपये दिले नाहीतर सोमवारी मी तुमच्या विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहे. तुम्ही असे नका समजु की माझ्या मागे कोणी नाही. मला अहिल्यानगर मधील मोठ मोठया हस्ती मदत करत आहेत. मी तुम्हाला संपवू पण शकते. अशी धमकी देत असल्याचे दराडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

प्रताप दराडे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा
समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल येथील मुळची असणारी सदरची पिडीता ही जोगेश्वरी (मुंबई) येथे असताना आरोपी दराडे यांनी या 30 वषय महिलेला लग्नाचे आमिष देऊन जवळीक साधली. ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुंबई आणि पालघर येथील फार्महाऊसवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने लग्नाची मागणी करताच दराडे यांनी संबंध विसरून जाण्याचे सांगितले आणि शिवीगाळ करत तिला दमदाटी करायला सुरवात केली. पीडितेने पोलिसांत जाण्याची धमकी दिली असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची आणि उलट तिच्यावर केस करण्याची धमकी दिली असल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक लोखंडे करत आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.

कोतवालीला लागली साडेसाती
कोतवाली पोलिस ठाण्यात आतापर्यंत आलेल्या बहुतांश पोलिस अधिकाऱ्यांना महिलांच्या प्रकरणाची साडेसाती लागल्याचे आता समोर आले आहे. या आधीच्या याच पोलिस ठाण्यातील विकास वाघ याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. आता दराडे यांच्याबाबतही महिलेचे प्रकरण समोर आल्याने हे पोलिस ठाणे वेगळ्या अर्थाने चर्चेत आले आहे.

कनिष्ठ कर्मचाऱ्यांनीच डाव केल्याची चर्चा!
पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनी दराडे यांच्यावर गेम केल्याची चर्चा आहे. यातील दोघांची अन्यत्र बदली झाल्याने ते दुखावले होते आणि त्यातूनच त्यांनी सदर महिलेला हाताशी धरत दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सदर महिलेला रसद पुरवल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर दक्षिण जिल्ह्याला झोडपले; नद्यांना पूर, पिके पाण्यात

पाथर्डी, जामखेड, नगर, श्रीगोंदा, कर्जतमध्ये तुफान पाऊस अहिल्यानगर | नगर सह्याद्री गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात...

शहरात खळबळ! खासदार ओवेसी यांच्या सभेला विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची धमकी, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेस विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची...

समाजकंटकांचा बाधा आणण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण, मोठा फौजफाट्यासह रॅपीड ॲक्शन फोर्सची तुकडी दाखल, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत पूर्वमुखी हनुमान मंदिरात मूतच्या चौथऱ्यावर...

राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवी मंदिरात घटस्थापना उत्साहात

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची घटस्थापना विधिवत पूजा करीत उत्साहात...