spot_img
ब्रेकिंगअबब! नगरमध्ये पकडली अफुची पावडर; पोलिसांनी विक्रीचा डाव उधळला

अबब! नगरमध्ये पकडली अफुची पावडर; पोलिसांनी विक्रीचा डाव उधळला

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
सोलापूर महामार्गावरील साकत शिवारातील पंजाबी ढाब्यावर अफूच्या पावडरची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून एका इसमाला अटक केली. या कारवाईत १० हजार रुपये किंमतीची ९४० ग्रॅम अफू पावडर जप्त करण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना माहिती दिली.

त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पथकाने गुरुवारी सायंकाळी ७ वाजता कारवाई केली. कारवाईदरम्यान, हॉटेल पंजाबी ढाब्यावर चंद्रकांत रघुनाथ शेळके (वय ५७, रा. गुणवडी, ता. जि. अहिल्यानगर) हा इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. पोलीस पथकाने त्याची व हॉटेलची झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेली अफूची पावडर सापडली. याप्रकरणी आरोपी विरोधात नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलिस उपनिरीक्षक पंतगे, पोलिस उपनिरीक्षक भरत धुमाळ, पोहेकॉ बाबासाहेब खेडकर, पोहेकॉ शरद वाढेकर, मपोना गायत्री धनवडे, मपोका सोनाली देशमुख पोका सागर मिसाळ यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जरांगेंसह मराठ्यांच्या रोषाचे धनी देवेंद्र फडणवीस?

आंदोलनाची व्याप्ती वाढत चालल्याने देवाभाऊंसह गृहखात्याची संपूर्ण यंत्रणा सपशेल अपयशी | जरांगे पाटलांची मुख्य...

‘आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?’ हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं? दिला मोठा आदेश

मुंबई / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज...

आंदोलनावर तोडगा न निघाल्यास…; पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..

पारनेर | नगर सह्याद्री मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते...

सीएसएमटी स्थानकात आंदोलकांचा गोंधळ!, लोकल अडवली, पुढे नेमकं काय घडलं?

रुळावर उतरून लोकल अडवली | चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र मुंबई | नगर सह्याद्री मराठा आरक्षणाचा मुद्दा...