spot_img
ब्रेकिंगस्मशानात मांडली अघोरी पूजा! बोकडाची मान अन् तरुणींचे फोटो; घटनेनं शहरात खळबळ..

स्मशानात मांडली अघोरी पूजा! बोकडाची मान अन् तरुणींचे फोटो; घटनेनं शहरात खळबळ..

spot_img

Maharashtra News: आधुनिकतेची कास धरत देशात प्रगती झाली असली तरी आजही रुढी, प्रथा आणि परंपरा ह्या कायम आहेत. शिवाय संपूर्ण नागरिक हे अंधश्रद्धेतू पूर्णत: बाहेर पडले आहेत असेही नाही. त्याचे कारण गावच्या स्मशानभूमिक कोणीतरी अज्ञातांनी अघोरी पूजा मांडली आणि ती पाहून ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट चौकशी करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

विद्या हासील करण्यासाठी अथवा घेतलेली सुपारी पूर्ण करण्यासाठी हे मांत्रिक स्मशानातच ‘अघोरी’ पूजा मांडतात. असाच एक प्रकार मोहाडी (प्र. डांगरी) येथील स्मशानभूमीत साधारणतः मध्यरात्री २.२० वाजता सुरु झाला. बाबा आणि त्याच्यासोबत काही जण स्मशानात आले. त्यांनी सोबत एक बोकड, दोन जीवंत कोंबडे आणि पुजेचे साहित्य आणले होते.

अघोरी कृत्य करणाऱ्या बाबाने एका बोकडाची मान धडावेगळी केली. दोन जीवंत कोंबड्यांचे पाय दोरीने बांधले. बोकडानंतर कोंबड्यांचा बळी जाणे निश्चित होते. बाबाने पुजेसाठी अग्नीडाग देण्यासाठी वापरण्यात येणारा ओटा निवडला होता. या ओट्यावरच लिंबूंचा खच, तरूणींचे फोटो, बोकडाची मान आणि इतर पूजासाहित्य मांडण्यात आले होते. तसेच अवतीभोवती रांगोळी काढण्यात आली होती. संबंधित अघोरी बाबाची पूजा ऐन भरात आलेली असताना नजिक शेत असलेल्या शेतकऱ्याला जाग आली.

त्याला स्मशानात सरण जळताना दिसले. तेथे काही लोकांच्या हालचाली संशयास्पदपणे दिसल्याने त्याने तिकडे टॉर्च चमकावली. आपल्याला कोणीतरी बघतयं ही चाहूल लागताच अघोरी बाबा आणि त्याच्या सोबतचे सहकारी दचकले.आपण लोकांच्या तावडीत सापडलो तर मार बसेल हे ओळखून त्यांनी स्मशानातून धूम ठोकली. दरम्यान, या घटनेची वार्ता गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सकाळी तिकडे धाव घेतली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...