spot_img
महाराष्ट्रभाजपचा आक्रमक पवित्रा, शिवसेनेच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार?

भाजपचा आक्रमक पवित्रा, शिवसेनेच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार?

spot_img

जालना : नगर सह्याद्री
आता हायुतीतील राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका मंत्र्याची मंत्री मंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणीच भाजपच्या नेत्याने केली आहे. तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांना लिहीले आहे. या पत्रातून संबधित मंत्र्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. त्याुळे लोकसभा निवडणुकीनंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हायुतीत वाद पेटण्याची दाट शययता आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सिल्लोड शहर अध्यक्षांनी ही आक्रमक मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपच्या सिल्लोड शहर अध्यक्षांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. पक्ष विरोधी काम आणि युती धर्म पाळला नसल्यामुळे मंत्रिमंडळातून अब्दुल सत्तार यांची हक्कलपट्टी करा, अशी थेट मागणी सिल्लोड शहर अध्यक्षांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

कमलेश कटारिया असं भाजपच्या सिल्लोड शहराध्यक्षांच नाव असून अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड भारतीय जनता पार्टी सध्या आक्रमक असल्याचेही पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्यामुळे भाजप ऍक्शन मोडवर असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...