spot_img
अहमदनगरनगरमध्ये वकील बांधव आक्रमक; सरकारला दिला 'असा' इशारा, आमदार थोरात, जगताप म्हणाले...

नगरमध्ये वकील बांधव आक्रमक; सरकारला दिला ‘असा’ इशारा, आमदार थोरात, जगताप म्हणाले…

spot_img

वकिलांच्या महामोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद / वकील संरक्षण कायदा मंजूर करा
अहमदनगर | नगर सह्याद्री- 
वकिलांवर होणार हल्ले थांबबेत, राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या करणार्‍या आरोपींना मोक्का लावा, हा खटला जलदगती कोर्टात चालवून उज्वल निकम यांची यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी या मागण्यासाठी  शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वकीलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महा मोर्चा काढला. या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने सर्व तालुयातील वकील सहभागी झाले होते.

जिल्हा न्यायलया पासून पायी निघालेल्या या मोर्च्यात सहभागी झालेल्या वकिलांनी एक वकील लाख वकील…., अ‍ॅडव्होकेट प्रोटेशन अ‍ॅट लागू झालाच पाहिजे… अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या. यावेळी शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश गुगळे यांच्या सह सर्व तालुयांच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.लहू कानडे, आ.संग्राम जगताप हे पायी या मोर्च्यात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा आल्यावर गेटवरच मोर्चा अडवण्यात आला. यावेळी वकिलांनी आक्रमक भूमिका व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शहर वकील संघटनेचे सचिव अ‍ॅड.संदीप शेळके, उपाध्यक्ष अ‍ॅड.महेश शेडाळे, महिला सहसचिव अ‍ॅड.भक्ती शिरसाठ, खजिनदार अ‍ॅड. शिवाजी शिरसाठ, सह सचिव अ‍ॅड.संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अ‍ॅड. अमोल अकोलकर, अ‍ॅड. सारस क्षेत्रे, अ‍ॅड.विनोद रणसिंग, अ‍ॅड. देवदत्त शहाणे, अ‍ॅड. शिवाजी शिंदे, अ‍ॅड.रामेश्वर कराळे, अ‍ॅड. अस्मिता उदावंत आदींसह माजी पदाधिकारी, सर्व तालुका असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

वकिलांची हत्या, मानवतेला काळिमा
राहुरी येथी दोन वकिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. संगमनेर बार असोसिएशनचा मी अजीव सदस्य आहे. त्यामुळे वहिलांच्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. वकिलांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यामुळे वकिल बांधवांमध्ये भितीचे वातावरण आहे. वकिल बांधवांच्या मोर्चात मोर्चात आ. थोरात यांनी सहभाग घेत मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
– अ‍ॅड. आ. बाळासाहेब थोरात
  (माजी महसूलमंत्री)

अट्टल गुन्हेगारांवर कारवाईची गरज ; आमदार संग्राम जगताप
राहुरी शहरातील वकील दांपत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली. ही निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दांपत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार आहे. सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...

केडगाव उपनगरात मध्यरात्री राडा!; कुटुंबासोबत घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील केडगाव उपनगरात शुक्रवार (दि. १७ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास दोन...

धनत्रयोदशीला आस्मानी संकट: ४८ तास मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण भारतात आसमानातून मुसळधार पावसाचा धोका निर्माण होण्याची...