spot_img
अहमदनगरसहाव्या विजयानंतर आमदार कर्डिले म्हणाले, जनतेचे माझ्यावर जीवापाड प्रेम, मंत्री असो नसो..

सहाव्या विजयानंतर आमदार कर्डिले म्हणाले, जनतेचे माझ्यावर जीवापाड प्रेम, मंत्री असो नसो..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
गेल्या 30 वर्षांपासून जनतेने माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचे श्रेय जनतेलाच जाते असे सांगत मंत्री असो किंवा नसो जनतेशी असलेले नाते कधीच तुटणार नाही असे प्रतिपादन आमदर शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

विधानसभा निवडणुकीतील सहाव्या विजयानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा जनता दरबार पुन्हा सुरू झाला आहे. निकालानंतर मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी, सरकार स्थापनेच्या बैठका आटोपताच कर्डिले नगरला परतले असून बुधवारी बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी सकाळी सात वाजता त्यांचा जनता दरबार सुरू झाला आहे.

तर ते आमदार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांकडून सत्कार स्विकारतानाच अडचणी, प्रश्न घेऊन आलेल्यांना दिलासा देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. गेली दोन महिने निवडणुकीसाठी पायाला भिंगरी बांधून प्रचंड मेहनत घेतली असली तरी कुठल्याही प्रकारचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही.

राहुरी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत कर्डिले यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. निकालानंतर लगेचच त्यांनी अतिशय विनम्रपणे आपल्या विजयाचे श्रेय त्यांच्यावर 30 वर्षापासून प्रेम करणाऱ्या जनतेला दिले. सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि प्रेम यामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती सहाव्यांदा आमदार झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. निकाल घोषित झाल्यानंतर पक्षाच्या बैठका, नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले.

तिथले सगळे सोपस्कार पूर्ण करून ते लगेचच आपल्या माणसांत परत आले. आणि बुधवारी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील जनतेने रिघ लावली होती . एकीकडे सत्कार स्वीकारत असतानाच ते फोनाफोनी करून लोकांच्या समस्या सोडवत होते. भावी मंत्री म्हणून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण मंत्री असू किंवा नसू माझे माझ्या जिवाभावाच्या लोकांशी असलेले नाते कधीच तुटणार नाही असा संदेश आ. कर्डिले यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...