spot_img
अहमदनगर'साकळाई'ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

spot_img

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न

सुनील चोभे / नगर सह्याद्री-
नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे साकळाई योजना कृती समितीची बैठक उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी सर्व सदस्यांनी योजना लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन करावे व प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी केली.

बैठकीत मराठा आरक्षणासाठी न्याय मिळवून दिल्याबद्दल उपसमितीचे अध्यक्ष नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा विशेष अभिनंदन ठराव करण्यात आला. तसेच डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार विक्रम पाचपुते यांनी साकळाई योजनेसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचेही कौतुक करून अभिनंदन करण्यात आले.

योजना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कृती समितीकडून हालचाली सुरू असून, जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेण्यासाठी संपर्क साधला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही बैठक होणार असून त्यानंतर समितीची पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.

बैठकीस साकळाई योजना कृती समितीचे अध्यक्ष ह. भ. प. बाबा महाराज झेंडे, संतोष राव लगड, नारायणराव रोडे, सोमनाथ घाडगे, योगेंद्र खाकाळ, मा. सरपंच सुरेश काटे, मार्केट कमिटीचे संचालक रामदास झेंडे, माजी सभापती प्रतापराव नलगे, कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम भैय्या लगड, चिखली गावचे सरपंच कुलदीप भैय्या कदम, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन गोरख सुभाष झेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव झेंडे, रोहिदास उदमले, तुकाराम काळे, मेजर एन. डी. कासार, धस मॅडम, पक्कडराव झरेकर, सुभाष काटे, नितीन राव नलगे, उपसरपंच सुधीर झेंडे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योजनेच्या कार्यवाहीस गती मिळावी आणि गावकऱ्यांच्या हितासाठी योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी समितीचे सदस्य एकजुटीने प्रयत्नशील आहेत. पुढील बैठकीत योजना अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय अपेक्षित आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...