spot_img
ब्रेकिंगउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ? दोन दिवस लागणार ब्रेक; कारण...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ? दोन दिवस लागणार ब्रेक; कारण काय?, वाचा सविस्तर..

spot_img

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मंगळवार (दि.22) पासून सुरू होणार असून शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे दोन दिवसांचा ब्रेक लागणार आहे. त्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी कऱण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होत आहे. तर २९ ऑक्टोबर ही अर्ज भऱण्याची शेवटची तारीख असणार आहे. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे माहिती राज्याचे निवडणूक अधिकारी पारकर यांनी दिली.

राज्यातील प्रतिष्ठित नेते पूर्णपणे ताकदीने, रॅली काढत आपला उमेदारी अर्ज भरतील. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यन, अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांचा अवधी आहे. पण चौथा शनिवार आणि रविवार असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. सार्वजनिक सुट्टी असल्याने शनिवार आणि रविवारी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे प्रत्याक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ असेल. सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेतच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज द्यावा लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डोनाल्ड टॅम्प यांनी फोडला टॅरिफ बॉम्ब, शेअर बाजारात भूकंप, घडले असे…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली...

सोलापूर हादरलं! थायलंडच्या भूकंपानंतर महाराष्ट्रातही 3 ठिकाणी धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सोलापूर / नगर सह्याद्री - गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांमध्ये...

खडकी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; विद्यार्थ्यांचे ‘मिशन आरंभ’मध्ये उतुंग यश

खडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम सुनील चोभे | नगर सह्याद्री जिल्हा परिषद...

डुप्लिकेट चावीची कमाल, चार लाख छूमंतरल; नगरमध्ये घडलं असं काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ...