spot_img
ब्रेकिंगअखेर 'ते' प्रकरण भोवल! संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास?

अखेर ‘ते’ प्रकरण भोवल! संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास?

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांना पत्नी मेघा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना दोषी ठरवले आहे. याशिवाय संजय राऊत यांनाही १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षादेखील सुनावण्यात आली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या याचिकेवर मुंबईतील शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवले. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. मेधा सोमय्या यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. ज्यावर सुनावणी पार पडली.

दरम्यान, याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची गुरुवारी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

१५ दिवसाची कैद असल्याने संजय राऊत जामीनास पात्र आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. ते स्वत:ला सरेंडर करतील. त्यानंतर न्यायालय त्यांना जामीन मंजूर करण्याची शयता आहे. सुनावणीवेळी संजय राऊत न्यायालयात हजर नव्हते. परंतु न्यायालयाने आपल्या नियोजीत वेळेत निकालाचे वाचन पूर्ण करून राऊत यांना या प्रकरणी दोषी ठरवले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...