spot_img
राजकारणआदित्य ठाकरेंनंतर ठाकरे परिवारातील दुसरी व्यक्ती निवडणूक लढवणार ! शर्मिला राज ठाकरे...

आदित्य ठाकरेंनंतर ठाकरे परिवारातील दुसरी व्यक्ती निवडणूक लढवणार ! शर्मिला राज ठाकरे या लोकसभेला उतरणार

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम निवडणूक लढवली. तो पर्यंत ठाकरे घरातील कुणीही निवडणूक लढवली नव्हती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे लोकसभेच्या रिंगणात उत्तरीतलं अशी चर्चा सध्या सुरु आहे.

शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे. दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल, असं सूचक वक्तव्य पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं. त्यामुळे शर्मिला ठाकरे या लोकसाभेला उभ्या राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील साईनाथ बाबर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका पत्नी आरती साईनाथ बाबर यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने खास महिलांसाठी “कोंढव्याची सौभाग्यवती 2024” कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास शर्मिला ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.

याच कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना आता महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं असल्याचे सांगितेल. त्यामुळे साईनाथ बाबर सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरणार का? अशीही चर्चा रंगली आहे. आम्ही निवडून येवो किंवा न येवो आमच्या पक्षातील कामे सुरू असतात, असेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...