पारनेर | नगर सह्याद्री;
अॅट्रसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी लंके समर्थक अॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, दीपक लंके यांचे अटकपूर्व जामीन नगरच्या सत्र न्यायालयाने फेटाळले. दरम्यान एकूण २४ आरोपींपैकी २१ आरोपींचे जामीन सत्र न्यायालयाने कायम केले.
नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात ६ जुन रोजी गोरेगांव ता. पारनेर येथे घडलेल्या घटनेप्रकरणी ७ जुलै रोजी महिलेने २४ आरोपींविरोधात अॅट्रसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी नगरच्या सत्र न्यायालयापुढे अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
१४ जुन रोजी न्यायालयाने सर्व आरोपींना अंतरिम जामीन मंजुर करून १ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली होती.या सुनावणीवेळी न्यायालयाने अॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी व खा. नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांचे अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द ठरवून त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. तर उर्वरीत प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, कारभारी पोटघन, दादा शिंदे, बाजीराव कारखिले, किशोर ठुबे, दत्ता ठाणगे, लखन ठाणगे, अक्षय चेडे, बंटी दाते, संदेश झावरे यासह दोघांचे अंतरिम जामीन कायम करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपींच्या वतीने अॅड. सतीश गुगळे, अॅड. अभिषेक भगत, अॅड. अरूण बनकर, अॅड गणेश कावरे, अॅड. स्नेहा झावरे यांनी काम पाहिले.