मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वत्र राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धुरळा उडवला आहे. या प्रचारसभेत राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. याचदरम्यान, आदित्य ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरत असताना शिंदे गटातील एका बड्या मंत्र्याचा फोन आला होता. त्यांनी ८ आमदार बंडाच्या तयारीत असल्याचं सांगितलं, असा दावा आदित्य ठाकरे यांनी वृत्तपत्राला मुलाखत देताना केला.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील एक मंत्री आणि ८ आमदार ठाकरे गटात येणार होते, असा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणे सुरु असताना शिंदे गटातील एका बड्या मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्यासह ८ आमदार बंड करत आहे. उद्धव ठाकरेंची माफी मागून पुन्हा पक्षात येतो, असं त्यांनी सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. मात्र, आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं आदित्य ठाकरेंनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.
‘एका मंत्र्यांसह ८ आमदार पुन्हा पक्षात येणार होते, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तो मंत्री कोण, ते एकूण आठ आमदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यावेळी आदित्य यांनी शिंदे गटावरही जोरदार टीका केली.