spot_img
मनोरंजनअभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय, सौंदर्य आणि साधेपणामुळे लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. दबंग, राउडी राठौर, सन ऑफ सरदार सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे तिने चाहत्यांच्या हृदयात वेगळीच जागा निर्माण केली आहे. पण इतकेच नाही तर सोनाक्षी सिन्हाने एक अनोखी कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आपले नाव नोंदवले आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे.

2016 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका खास कार्यक्रमात सहभागी होत सोनाक्षी सिन्हाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. हा कार्यक्रम इंग्लोट या आंतरराष्ट्रीय कलर कॉस्मेटिक ब्रँड आणि तिची भारतीय पार्टनर मेजर ब्रँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमामध्ये एकूण 1,328 महिलांनी एकाच वेळी नखांना रंग लावण्याचा जागतिक विक्रम केला. सोनाक्षी सिन्हा देखील या उपक्रमाचा भाग होती. त्यामुळे या अनोख्या रेकॉर्डमध्ये तिचे नाव अधिकृतरीत्या समाविष्ट झाले. त्या वेळी तिची आई पूनम सिन्हा देखील उपस्थित होत्या. सोनाक्षी सिन्हाने या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर करून आपला आनंद व्यक्त केला होता.

‘लहानपणी वाटायचं… माझं नाव कधी येईल?’
गिनीज बुकमध्ये नावाचा समावेश झाल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, लहानपणी मी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स येण्याची आतुरतेने वाट बघायचे आणि विचार करायचे की कधी माझं नावही यात येईल का? आज इतक्या महिलांसोबत उभं राहून हा क्षण अनुभवताना खूप अभिमान वाटतो.

आजच्या काळात महिला स्वतःची मते मोकळेपणाने मांडत आहेत. हेच खरं महिला सशक्तिकरण आहे. महिलांनी एकमेकींचा हात धरला, एकमेकींना साथ दिली, तर आपल्याला रोखणारा कोणीही नाही असं ती म्हणाली.

सोनाक्षीच्या चाहत्यांसाठी अभिमानाचा क्षण
अभिनयाच्या जोरावर यश मिळवलेल्या सोनाक्षी सिन्हाने एका समाजिक आणि सर्जनशील उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. महिलांसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी हा क्षण जसाच्यातसा आजही प्रेरणादायी ठरतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...