spot_img
अहमदनगरअभिनेत्री शिवानी सुर्वे रविवारी नगर जिल्ह्यात, कार्यक्रम काय?, वाचा सविस्तर

अभिनेत्री शिवानी सुर्वे रविवारी नगर जिल्ह्यात, कार्यक्रम काय?, वाचा सविस्तर

spot_img

यशोधन मैदानावर शनिवार व रविवार महिलांसाठी क्लब दांडिया
संगमनेर। नगर सहयाद्री
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर वैभवशाली सुसंस्कृत व राज्याला दिशादर्शक ठरले आहे. नवरात्र उत्सव हा महिला शक्तीचा सन्मान करणारा असून नवरात्री निमित्ताने शनिवार व रविवारी फक्त महिला भगिनींसाठी यशोधन मैदानावर सायंकाळी 7 ते 10 या वेळेत क्लब दांडिया होणार असून रविवार 28 सप्टेंबर रोजी देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे महिलांसोबत दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचीमाहिती आयोजक प्रतीक जाजू,रोहन मुर्तडक व विनायक गरुडकर यांनी दिली आहे.

यशोधन मैदानावर शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 व रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी कुटुंब फाउंडेशन शिवतांडव प्रतिष्ठान हिंदुराजा प्रतिष्ठान यांच्या वतीने सायंकाळी 7 ते 10 यावेळी महिलांसाठी मोफतदांडिया क्लब होणार आहे.या कार्यक्रमांमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, यांच्यासह विविध मान्यवर महिला सहभागी होणार आहेत. शनिवारी नागपूर येथील प्रसिद्ध गरबा नृत्य दिग्दर्शक यश तुमाने हे सहभागी होणार आहे. यावेळी ते संगमनेर मधील पहिल्यांदा गरबा नृत्य दिग्दर्शित करणार आहे. तर रविवारी देवयानी महाराष्ट्रातील मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे रात्री सात ते दहा या वेळेत महिलांसोबत दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहणार आहे. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात व सौ.दुर्गाताई तांबे या ही महिलांसोबत दांडिया खेळणार आहेत.

यशोधन मैदानावर दांडिया क्लब साठी जय्यत तयारी करण्यात आली असून पावसाच्या दृष्टीने 100 ु 120 फुटाचा डोम मंडप तयार करण्यात आला आहे. याचबरोबर एलईडी स्क्रीन भव्य स्टेज महिलांसाठी दांडिया खेळण्याकरता भव्य मैदान, आकर्षक लाइटिंग व्यवस्था, सेल्फी पॉईंट, रील साठी व्यवस्था अशा अद्यावत सुविधा करण्यात आले आहेत. सर्व महिला व तरुणींना मोफत प्रवेश असणार आहे. तरी या क्लब दांडियामध्ये शहरातील व तालुक्यातील सर्व महिला व तरुणीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुटुंब फाउंडेशन, शिव तांडव प्रतिष्ठान, हिंदू राजा प्रतिष्ठान व एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवानी सुर्वे प्रत्येकी सोबत दांडिया खेळणार
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री देवयानी शिवानी सुर्वे या पूर्णवेळ दांडियामध्ये सहभागी होणारा असून सर्व सहभागी महिला व युवती समवेत त्या स्वतंत्र दांडिया खेळणार आहेत. याचबरोबर आय लव संगमनेर चळवळीच्या वतीने संगमनेर शहरांमध्ये सुरू असलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने क्लब दांडियाची जोरदार तयारी यशोधन मैदानावर करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा...

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...