spot_img
मनोरंजनActress Katrina Kaif : अभिनेत्री कतरिनाने जिंकली सर्वांची मने; घडले असे कि...

Actress Katrina Kaif : अभिनेत्री कतरिनाने जिंकली सर्वांची मने; घडले असे कि सर्वच चकित झाले

spot_img

मुंबई – Actress Katrina Kaif अभिनेत्री कतरिना कैफ कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. विकी कौशल Vicky Kaushal मुख्य भूमिकेत असलेला सॅम बहादुर’ [Sam Bahadur] येत्या १ डिसेंबरला देशासह जगभरामध्ये रिलीज होत आहे. चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असून बुधवारी निर्मात्यांकडून चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कतरिना कैफसोबत, विकी कौशलच्या आई वडीलांनीही हजेरी लावली.

चित्रपटातील कलाकारांच्या फॅमिलीसाठी, सोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींसाठीही स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. याप्रसंगी कतरिना कैफने ब्लॅक कलरच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये तर विकी सुद्धा ब्लॅक कलरच्या शर्ट, पँट आणि कोटमध्ये स्पॉट झाला होता. सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी विकीच्या आई- वडिलांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी कतरिनाच्या कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी इन्स्टाग्राम चॅनलने कतरिनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कतरिना मीडियाच्या गर्दीमध्ये आपल्या सासु- सासर्‍यांना कशा प्रकारे सांभाळते, हे दिसले. यावेळी नेटकर्‍यांनी कतरिनाला केअरिंग बहु’ म्हणून तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी कौशल फॅमिलीला सॅम बहादुर फॅमिली’ म्हणून बोलले आहे.

सोबतच कतरिनाच्या साधेपणाचेही नेटकरी तुफान कौतुक करत आहेत. त्यामुळे कतरिनाचे सर्वांची माने जिंकली. सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रिनिंगला विक्की कौशलच्या आई वडीलांनीही उपस्थित लावली होती. यावेळी विकी कौशलचे वडील शाम कौशल, आई वीणा कौशल येताच विकी त्यांच्या पाया पडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर: नगराध्यक्ष पदासाठी चौघांची एन्ट्री, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवार रिंगणात ; कोणी केले अर्ज सादर?

श्रीरामपूर / नगर सह्याद्री नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून...

नगर–मनमाड महामार्गावर अग्नितांडव! लक्झरी बस–कारची भीषण धडक; कारचालक जळून ठार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री – नगर–मनमाड महामार्गावर कोपरगावजवळील भास्कर वस्ती येथे शुक्रवारी (14 नोव्हेंबर)...

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...