spot_img
ब्रेकिंग'अभिनेते अमीर खान यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट'; काय म्हणाले पहा..

‘अभिनेते अमीर खान यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट’; काय म्हणाले पहा..

spot_img

बीड । नगर सहयाद्री-
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर अभिनेता आमिर खानने (संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुलगा विराजला मिठी मारत आमिरने त्यांना भावनिक आधार दिला.

पाणी फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता आमिर खान याने बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. या भेटीवेळी संतोष देशमुख यांचा अल्पवयीन मुलगा विराजही उपस्थित होता. आमिरने त्याला मिठी मारत धीर दिला, आणि कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान आमिरसोबत त्याची एक्स पत्नी किरण राव देखील उपस्थित होती.

या क्षणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात आमिर कुटुंबियांसोबत संवाद साधताना दिसतो. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे) यांचा निकटवर्तिय असलेला वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले. हे प्रकरण विरोधकांनी देखील लावून धरत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, आणि अखेर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...